जिल्हा कचेरी, जि.प.वर पाण्यासाठी घागर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:38 AM2018-05-25T00:38:19+5:302018-05-25T00:38:19+5:30
तालुक्यातील इंचा येथील पाणीप्रश्न अनेक दिवसांपासून गंभीर बनला आहे. प्रशासनही लक्ष देत नसल्याने २४ मे रोजी जिल्हाधिकारी व जि.प. कार्यालयावर प्रहार जनशक्ती व रिपाइंच्या वतीने घागर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी व सीईओंच्या प्रतीकात्मक खुर्च्यांना हार घातले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील इंचा येथील पाणीप्रश्न अनेक दिवसांपासून गंभीर बनला आहे. प्रशासनही लक्ष देत नसल्याने २४ मे रोजी जिल्हाधिकारी व जि.प. कार्यालयावर प्रहार जनशक्ती व रिपाइंच्या वतीने घागर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी व सीईओंच्या प्रतीकात्मक खुर्च्यांना हार घातले.
इंचा येथील पाणीप्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी १९ मे रोजी ग्रा.पं. वर घागर मोर्चा काढला होता. तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही. परिणामी, इंचा येथील एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याने एक दिवस टँकरने केलेला पाणीपुरवठाच प्रशासन आम्ही केल्याचे सांगत होते. मोर्चाला आदिवासी पँथरनेही पाठिंबा दिला. यावेळी अॅड. विजय राऊत, अॅड. प्रशांत बोडखे यांनी पाण्याची समस्या मांडली. बऱ्याच विलंबाने ग्रामीण पुरवठा विभागाचे भागानगरे निवेदन स्वीकारण्यास आले असता मोर्चेकºयांनी त्यांना निवेदन देण्यास नकार दिला. उशिरापर्यंत जि. प. कार्यालयासमोर मोर्चेकºयांनी ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.