जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:13 AM2018-04-08T00:13:07+5:302018-04-08T00:13:07+5:30
महराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संंटघटने तर्फे ७ एप्रिल रोजी विविध मागण्या संदर्भात घंटनाद आंदोलन करण्यात आले. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध शिक्षक संघटना व राजकीय नेत्यांनीही आंदोलनास पाठींबा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संंटघटने तर्फे ७ एप्रिल रोजी विविध मागण्या संदर्भात घंटनाद आंदोलन करण्यात आले. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध शिक्षक संघटना व राजकीय नेत्यांनीही आंदोलनास पाठींबा दिला.
शासनाने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाºया कर्मचाºयांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ अंतर्गत असलेली पेन्शन योजना बंद करुन नवीन परिभाषिक अंशदायी पेंशन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली. या दोन्ही पेंशन योजनांचे स्वरुप पाहता या योजना कर्मचाºयांचे भविष्य अंधकारमय करणाºया असल्याने कर्मचाºयांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे जुनीच पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी केली. निवेदनात म्हटले की, विधिमंडळाच्या अधिवेशनात संघटनेने मुंडण आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्मचाºयांना सेवा व मृत्यू उपदान तसेच कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ तत्काळ देऊ, जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार करु, असे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप याबाबत निर्णय घेतला नाही. शिवाय आश्वासनाच्या आठवणींसाठी घंटानाद १८ डिसेंबर २०१७ रोजी नागपूर येथील विधीमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेच्या शिष्टमंडळासमोर येऊन आश्वासने दिली होती. त्यात सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचाही विचार करु, असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. निवेदनावर जिल्हाअध्यक्ष राजेंद्र पाटील, भालचंद्र आळणकर, अमोल शर्मा, शंकर लेकुळे, दत्ता पडोळे, हरिशचंद्र गोलाईतकर, नारायण चापके यांच्यासह पदाधिकाºयांच्या स्वाक्षरी आहेत. यावेळी आ. डॉ. संतोष टारफे, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, भैय्यासाहेब देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदींनी भेट दिली. तसेच संघटनेच्या वतीने खानापुर चिता येथील अपघातात मयत झालेले शिक्षक शिवाजी कोरडे यांच्या कुटुंबियास मुलींच्या नावे २ लाख ४० हजार रु.मदत केली.