मुलींचे वसतिगृह पुन्हा चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:34 AM2018-01-10T00:34:38+5:302018-01-10T00:34:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : निधी परत जाण्याच्या भीतीने प्रशासनाकडूनच मुलींच्या वसतिगृहाचे काम जि.प. शाळेच्या मैदानावरील जागा निश्चित न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : निधी परत जाण्याच्या भीतीने प्रशासनाकडूनच मुलींच्या वसतिगृहाचे काम जि.प. शाळेच्या मैदानावरील जागा निश्चित न करताच रेटण्याची घाई का होत आहे, असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला.
जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीस सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती प्रल्हाद राखोंडे, संजय देशमुख, रेणूका जाधव, अति.मुकाअ ए.एम.देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी गटनेते अंकुश आहेर यांनी दुर्धर आजारावर मदतीसाठी १८१ अर्ज आले असताना मागील दीड वर्षापासून बैठक झाली नसल्याचे समोर आणले. तर यात दहा लाखांची तरतूद असून पुनर्विनियोजनात आणखी दहा लाखांची मागणी केली. प्रशासनाकडून उत्तर देताना यात १२८ पात्र लाभार्थी असून त्यांना दहा हजार प्रत्येकी मदत देण्यात येईल. येत्या सात दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले. विषय समित्यांच्या अनुपालन अहवालाबातही सर्वच सदस्यांनी आक्रमकपणे मागणी केली. तर जि.प.सदस्य अजित मगर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अजूनही ३६ कोटी शिल्लक आहेत. वारंवार मागणी करूनही रक्कम मिळत नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी त्यासाठी काहीच पाठपुरावा का केला नाही, असा सवाल करण्यात आला. कृषी अधिकारी खंदारे हे गुणनियंत्रण निरीक्षक आहेत. बोंडअळीच्या आक्रमणानंतरही त्यांनी काहीच काम केले नाही. त्यांच्यावर कारवाईची मागच्या बैठकीत मागणी केली तर आज त्यांना ऐनवेळी नोटीस दिली. त्यामुळे केवळ ठरावांना उत्तरे देण्याचीच कामे होत असल्याचा आरोपही सदस्यांनी केला. यात जि.प.त किती ठराव झाले. त्यांचा काय पाठपुरावा केला जातो, असे संजय कावरखे यांनी विचारले. तर आहेर यांनी किती विकासकामांच्या गंभीर तक्रारी झाल्या, त्यापैकी निपटारा कितींचा बाकी आहे, हे स्थायीसमोर मांडण्यास सांगितले. मात्र अनेक विभागांकडे अशा तक्रारीच नव्हत्या. तर मुलींच्या वसतिगृहांचा प्रश्नही त्यांनी आक्रमकपणे मांडला. यात जि.प.त ठराव झाला की दुसºयाच दिवशी काम सुरू झाले. त्याला मार्क आऊट कुणी दिले, मोक्याची जागा द्यायची नाही, हे ठरल्यावरही मोक्याच्या जागेवरच काम कसे सुरू झाले, याबाबत विचारणा केली. तर मुख्य अभियंत्यांना याबाबत चर्चा करण्याचे ठरले असता दूरध्वनीच लागला नाही.