मुलींनी गाठली थेट जिल्हाकचेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:34 AM2018-10-10T00:34:35+5:302018-10-10T00:34:57+5:30
शहरातील कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयात आवश्यक कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींनी थेट ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हाकचेरी गाठली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयात आवश्यक कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींनी थेट ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हाकचेरी गाठली.
मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी व शाळेतील गळती कमी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. तर दुसरीकडे हिंगोली येथील कस्तूरबा गांधी विद्यालयातील मुलींना मात्र विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कस्तूरबा गांधी विद्यालयातील मुलींना वेळेत भोजन दिले जात नाही. दिले तर ते अर्धवट शिजलेले असते, विद्यालयात वेळेवर तासिका भरत नाहीत, शिवाय शाळेतील कामेही करावी लावली जात असल्याने या नेहमीच्या त्रासाला कंटाळून जवळपास ७० मुलीनीं थेट मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाकचेरीसमोर अचानक मुली एकत्र जमल्याची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील संबधित कर्मचारी हजर झाले होते. शिक्षणाधिकारी यांच्यापुढे विद्यालयातील समस्यांचा पाढाच विद्यार्थिनीनीं वाचून दाखविला. यावेळी काही विद्यार्थिनींना आश्रू अनावर झाले होते. संबधित विद्यालयाची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी विद्यार्थिनींना दिले. काही वेळानंतर विद्यालयातील शिक्षक व इतर कर्मचारी हजर झाले व विद्यार्थिनींना शाळेत घेऊन गेले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी मात्र मुलींची भेट होऊ शकली नाही.
हिंगोली येथील कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयात पाचवी ते दहावीतील शंभरच्या जवळपास मुली निवासी शिक्षण घेत आहेत. विद्यालयातील निकृष्ठ भोजन, तासिका भरल्या जात नाहीत, मुलींना स्वयंपाक करायला लावणे त्यामुळे मुलींचे हाल होत आहेत. प्रशासन येथील मुलींच्या समस्यांकडे खरंच लक्ष देईल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय चौकशीचे आवश्वासनही मुलींना शिक्षणाधिकाºयांनी दिले आहे.
मुलींची गैरसोय : चौकशी केली जाईल...
कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयातील असुविधेबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांना विचारले असता ते म्हणाले, संबधित शाळेची चौकशी केली जाईल. त्यानंतर नियमानुसार योग्य कारवाई करण्यात येईल असे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक विद्यार्थिनीं जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडून बसल्याने अनेकांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.