प्रेमी युगुलाने पळून जाऊन केले लग्न; मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरावर चढवला हल्ला; तिघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 11:59 AM2021-06-14T11:59:09+5:302021-06-14T11:59:45+5:30

Crime News in Hingoli केळी तांडा येथील एकाच समाजातील युवक आणि युवतीचे एकमेकांवर शालेय जीवनापासून प्रेम होते.

Girl's relatives attack boy's home after love marriage; Three seriously injured | प्रेमी युगुलाने पळून जाऊन केले लग्न; मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरावर चढवला हल्ला; तिघे गंभीर जखमी

प्रेमी युगुलाने पळून जाऊन केले लग्न; मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरावर चढवला हल्ला; तिघे गंभीर जखमी

Next
ठळक मुद्दे औंढा तालुक्यातील केळी तांडा येथील घटना  

औंढा नागनाथ ( हिंगोली ) : तालुक्यातील केळी तांडा येथील एका प्रेमी युगलाने नातेवाईकांच्या संमतीविना घरातून पळून जाऊन विवाह केला. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरी जाऊन त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, केळी तांडा येथील एकाच समाजातील युवक  आणि युवतीचे एकमेकांवर शालेय जीवनापासून प्रेम होते. सध्या दोघेही लॉकडाऊन असल्याने गावाकडे आहेत. या दरम्यान त्यांच्यात जवळीकता वाढल्याने दोघांनी विवाहाचा प्रस्ताव घरच्यासमोर मांडला. परंतु,  मुलीच्या नातेवाईकांनी लग्नास नकार दिला. यामुळे दोघांनी 31 मे रोजी औंढा पोलीस ठाणे गाठले. आम्ही दोघेही सज्ञान असून आम्हाला लग्न करायचे आहे. परंतु, यासाठी घरच्यांकडून विरोध होत आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी दोघांच्याही नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. मात्र, मुलीच्या नातेवाईकांचा लग्नास नकार कायम राहिला 

यानंतर दोघांनी 1 जून रोजी मंदिरात जाऊन लग्न केले. रविवारी मुलीकडील १० ते १५ नातेवाईकांनी मुलाच्या घरात घुसून त्याच्या नातेवाईकांवर हल्ला केला. यामध्ये मुलाचे वडील, काका, भाऊ आणि घरातील इतर सदस्यांना गंभीर मारहाण केली. यातील तिघांना गंभीर मार लागला असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याबाबत अद्याप कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही.

Web Title: Girl's relatives attack boy's home after love marriage; Three seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.