पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविकाधारकांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:08+5:302021-07-17T04:24:08+5:30

दिलेल्या निवेदनात म्हटले की, पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविकाधारक हे गायी-म्हशीमध्ये कृत्रिम रेतन करणे, गर्भ तपासणी करणे, वंध्यत्वावर साधारण ...

Give justice to livestock management and dairy diploma holders | पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविकाधारकांना न्याय द्या

पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविकाधारकांना न्याय द्या

googlenewsNext

दिलेल्या निवेदनात म्हटले की, पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविकाधारक हे गायी-म्हशीमध्ये कृत्रिम रेतन करणे, गर्भ तपासणी करणे, वंध्यत्वावर साधारण उपचार करणे, जनावरांचे लसीकरण करणे, जखमा धुणे, मलमपट्टी करणे आदी कामे करतात. अनेक वेळा पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे केली जातात. यातून मिळालेल्या पैशांतून उदरनिर्वाहासाठी मदत होते; परंतु आता शासनाने महाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेच्या सूचनेनुसार पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविकाधारकांवर बोगस डॉक्टर म्हणून कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्री, विधानसभा, विधान परिषद, तसेच विरोधी पक्षनेते यांच्याकडे न्याय मागणीबाबत पाठपुरावा करावा व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनात आ. संतोष बांगर यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र पशू सेवादाता संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम क्षीरसागर, गंगाधर माठे, गणेश सूर्यवंशी, प्रवीण पंचलिंगे, हनुमान मगर, राजेश काळे, गजानन काळे, शिवशंकर सूर्यवंशी, यशवंत वाघमारे, हरीश बोरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Give justice to livestock management and dairy diploma holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.