साळवा सरपंचपदी गोकर्णा करंडे तर उपसरपंचपदी देविदास ढेपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:31 AM2021-02-16T04:31:21+5:302021-02-16T04:31:21+5:30
साळवा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी १५ फेब्रुवारी रोजी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी सरपंचपदासाठी गोकर्णा बळीराम करंडे यांचा ...
साळवा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी १५ फेब्रुवारी रोजी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी सरपंचपदासाठी गोकर्णा बळीराम करंडे यांचा तर उपसरपंचपदासाठी देविदास ढेपे यांचा एकमेव अर्ज आला होता. दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज आल्याने सरपंचपदी गोकर्णा करंडे तर उपसरपंचपदी देविदास ढेपे यांची निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी बी. के. कुरवडे यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुष्मा दयानंद माखणे, मंदाताई तुकाराम करंडे, पुष्पांजली प्रवीण पाईकराव, ग्यानोजी राजाराम माखणे, देविदास पुरभाजी औटे, पांडुरंग कचरु मीटकर यांची उपस्थिती होती. अध्यासी अधिकाऱ्यांना तलाठी बी.एस. जाधव, ग्रामसेवक जाधव यांनी मदत केली. निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृउबा समितीचे माजी सभापती तथा माजी जि.प.सदस्य नागोराव मारोतराव करंडे, माजी उपसभापती धम्मपाल पाईकराव यांची उपस्थिती होती. कृऊबाचे माजी सभापती नागोराव करंडे व माजी उपसभापती धम्मपाल पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली जयभवानी विकास पॅनलने सर्वच जागा जिंकत विजय मिळविला.
फोटो २१