गुड मॉर्निंग पथकाच्या तावडीत चोरटे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:12 AM2018-09-19T01:12:40+5:302018-09-19T01:12:55+5:30
वसमत शहरात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर तीन जागी चोऱ्या केल्या. चोरीचा माल घेऊन जातानाच ३ चोरटे पोलिसांच्या गुडमॉर्निंग पथकाच्या तावडीत सापडले. त्यामुळे तिन्ही चोºयांचा माल हस्तगत होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. चोरीनंतर चोरटे जेरबंद झाल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत शहरात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर तीन जागी चोऱ्या केल्या. चोरीचा माल घेऊन जातानाच ३ चोरटे पोलिसांच्या गुडमॉर्निंग पथकाच्या तावडीत सापडले. त्यामुळे तिन्ही चोºयांचा माल हस्तगत होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. चोरीनंतर चोरटे जेरबंद झाल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
वसमतमधील बसस्थानकाजवळील अविनाश सुभाष अंभोरे यांची पानटपरी फोडून रोख व साहित्य असा ६ हजार ३७० रुपयांचा ऐवज, धनंजय सीताराम वडिपल्ली यांची बिअर शॉपी फोडून २ हजार ४८४ रुपयांचा ऐवज तर अक्षय श्रीरंग जाधवचे जनरल स्टोअर्स दुकान फोडून १२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. चोरी करून चोरटे जात असतानाच गुडमॉर्निंग गस्ती पथकाचे पोलीस निरीक्षक आर.आर.धुन्ने, कृष्णा चव्हाण, राजू सिद्धीकी आदींच्या तावडीत तीन चोरटे सापडले. चोरट्यांचा पाठलाग करून पोलिसांनी मुद्देमालासह तीन चोरट्यांना जेरबंद केले. चोरीची तक्रार येण्यापूर्वीच चोरटे जेरबंद करण्याची कामगिरी वसमत पोलिसांनी केली. त्यामुुळे शहरात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. या प्रकरणी तिन्ही चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
११ जुगारी पकडले
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ येथे जि.प. शाळेच्या मोकळ्या मैदानात १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असताना ११ जणांवर कार्यवाही हट्टा पोलिसांनी केली आहे. पुरजळ येथे जुगार खेळत असल्याची माहिती जवळा बाजार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर अरविंद गजभार, सचिन शिंदे, विशाल काळे, रात्री पेट्रोलिंग करीत असताना काहीजण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत होते. यामध्ये भारत पांडुरंग आव्हाड, बंडू दुर्गादास कुºहे, विकास मारोती रोकडे, मारोती चंद्रकांत मगर, शेख रजाक, राहूल अशोक हारके, नवनाथ दगडू चोपडे, शेख कलीम, शेख सलीम, गणेश पांडुरंग समींद्रे, गंगाधर देविदास सोनटक्के यांच्याकडे नगदी १९२० रूपये व जुगार साहित्य सापडले.
विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू
कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा शिवारातील एका शेतातील विहिरीत वयोवृद्ध मयत तय्यबखाँ समशेरखाँ पठाण (७३) पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. १७ सप्टेंबर रोजी रात्री शेतातील विहीरीत संध्याकाळी ७ ते सकाळी ६ च्या दरम्यान बुडून मृत्यू झाला आहे. या प्ररकणी खबर देणार गुलाब खाँ पठाण यांच्या माहितीवरुन कुरुंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जमादार शंकर इंगोेले हे करत आहे. प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले असून घटनास्थळी फौजदार वाघमोडे, नेटके यांनी भेट देऊन पाहणी केली.