राग नियंत्रणामुळे चांगले काम करण्यास वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:19 AM2019-01-20T00:19:49+5:302019-01-20T00:20:07+5:30
राग हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. कारण होणारी कामे रागामुळे कधी बिघडतील, हे सांगता येत नाही. या रागावर विजय मिळविण्यासाठी मकरसंक्रांतीचा सण तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला असे सांगून जातो. खरेतर रोजच असे गोड बोलून चांगले काम करण्याचा संकल्प करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे हिंगोली जि.प.च्या अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राग हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. कारण होणारी कामे रागामुळे कधी बिघडतील, हे सांगता येत नाही. या रागावर विजय मिळविण्यासाठी मकरसंक्रांतीचा सण तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला असे सांगून जातो. खरेतर रोजच असे गोड बोलून चांगले काम करण्याचा संकल्प करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे हिंगोली जि.प.च्या अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, लोकमतने गुड बोला, गोड बोला हा उपक्रम सुरू करून माणसाला चांगले काम करण्याची प्रेरणा समोर उभी केली आहे. अशा उपक्रमांची आज गरज आहे. सामाजिक जीवनात काम करताना मीतभाषी माणसाला रागावर नियंत्रण असते. त्यामुळे इतरांना समजून घेता येते. इतरही आपले म्हणने काळजीने ऐकतात. सुसंवादातून एखादे न होणारे कामही उभे राहते. मात्र राग, त्रागा केल्यास समोरचाही विरोधाला विरोध कायम ठेवतो. त्यामुळे चांगल्या कामाची पायाभरणी करायची झाल्यास शांत, संयमी राहणे गरजेचे असते. खरेतर समाज माध्यमांच्या आजच्या युगात राग येतील, अशा अनेक बाबी घडतात किंवा समोर आणल्या जातात. अशावेळी संयमाने घेण्याची गरज आहे. रागात येवून कोणी केलेले एखादे कृत्य अवघ्या मानव जातीस वेठीस धरू शकते. अशावेळी गुड बोला, गोड बोलाची आठवण झाली पाहिजे.
या मकरसंक्रांतीच्या सणाला लोकमतच्या उपक्रमात सहभागी होवून सर्वांनी रागावर नियंत्रण मिळविण्याचा, चांगली कामे करण्याचा, संकल्प करुयात. या बाबींचा अंगीकार करून जिल्ह्याच्या विकासाची कास धरुयात. या उपक्रमालाही माझ्या मनापासून शुभेच्छा...