गुडबाय मार्च २०२०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:30+5:302020-12-31T04:29:30+5:30

जिल्ह्यातील दोन गावांतील २३३ शेतकऱ्यांना पहिल्या यादीत कर्जमुक्तीचा लाभ मिळाला. त्यानंतर दुसरी यादी प्राप्त झाली. यात ७२ हजार ३०५ ...

Goodbye March 2020 | गुडबाय मार्च २०२०

गुडबाय मार्च २०२०

Next

जिल्ह्यातील दोन गावांतील २३३ शेतकऱ्यांना पहिल्या यादीत कर्जमुक्तीचा लाभ मिळाला. त्यानंतर दुसरी यादी प्राप्त झाली. यात ७२ हजार ३०५ शेतकरी पात्र ठरले.

२ मार्च

तिघांवर ॲट्राॅसिटी, तर चौघांवर जबरी चोरीचा गुन्हा

जिल्ह्यातील जवळा बाजार येथील एका ॲटोमोबाइलच्या दुकानासमोर तिघांनी फिर्यादीला शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे व साथीदाराला मारहाण करीत धमकी दिली. याप्रकरणी तिघांवर ॲट्रॉसिटी, तर चौघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

३ मार्च

दिव्यांगांचे तहसीलसमोर उपोषण

जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. या उपोषणात मोठ्या प्रमाणात दिव्यांगांचा समावेश होता.

४ मार्च

अवैध वाळू उपसा, आठ जणांवर गुन्हा

कयाधू नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरचालक, मालक अशा आठ जणांविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

५ मार्च

नकली सोने देऊन वृद्धेची फसवणूक

वसमत येथील हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेला सोन्याचे नकली बिस्कीट देऊन तिच्या जवळील अंगठी व सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली.

६ मार्च

आर्त हाक वाटसरूने ऐकल्याने जीव वाचला

हिंगोली येथील रामगल्ली भागात दारूच्या नशेत एक जण विहिरीत पडला. एका मुलाने यादरम्यान वाचवा-वाचवा अशी आर्त हाक दिली. यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले.

७ मार्च

शाॅर्टसर्किटमुळे घराला आग

हिंगोली शहरातील श्रीनगर कॉलनीतील शिवाजी राघोजी पारखे यांच्या घराला आग लागली. यात त्यांचे ८३ हजार रुपयांचे नुकसान झाले.

८ मार्च

ग्रामसभेत येऊन कागदपत्रे भिरकाविली

ग्रामसभा सुरू असताना गावाच्या विकासकामांसंदर्भात चर्चा होत असताना नांदेड येथील एक महिला ग्रामसभेत आली. तिने सरपंचांच्या खुर्चीवर बसून शासकीय कागदपत्रे घेऊन भिरकाविली. ही घटना आखाडा बाळापूर येथे घडली.

९ मार्च

एलसीबीची धडक कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच ठिकाणी कारवाई करून आरोपींकडील १० लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

१० मार्च

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा

दोन मुलीच आहेत, मुलगा नाही, लग्नातील हुंड्याच्या राहिलेल्या १ लाख रुपयासाठी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने सेनगाव पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

१२ मार्च

शेततळ्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू

धूलिवंदनाच्या दिवशी पार्टी करण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी दोघांचा शेततळ्यात मृत्यू झाला. ही घटना वसमत तालुक्यातील बागलपार्डी येथे घडली.

१५ मार्च

५१८ पैकी तब्बल ६१ पाणी नमुने आढळले दूषित

जगभर थैमान घातलेल्या काेरोनाचा धसका घेतला जात आहे. साफसफाई व पिण्याच्या पाण्याकडे लक्ष दिले जात आहे. जिल्ह्यात ५१८ पैकी ६१ पाणी नमुने तपासणी अंती दूषित आढळले आहेत.

२३ मार्च

पळून गेलेले आरोपी अटकेत

हट्टा पोलीस ठाण्यातून सकाळी पाच वाजता लघुशंकेसाठी आरोपीला घेऊन जात असताना पोलिसांना हिसका देऊन आरोपींनी पळ काढला. त्याला परभणी जिल्ह्यातील शेतशिवारातून अटक करण्यात आली.

३० मार्च

हिंगोलीत पोलिसांकडून पत्रकाराला मारहाण

वाहतूक शाखेच्या विरोधात अनेकदा वृत्त प्रकाशित केल्याचा राग काढत वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांनी ‘आयबीएन लोकमत’च्या प्रतिनिधीला मारहाण केली. यामुळे त्यांना रुग्णालयात भर्ती व्हावे लागले.

Web Title: Goodbye March 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.