गुडबाय सप्टेंबर २०२०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:41+5:302020-12-31T04:29:41+5:30
हिंगोली : बळसोंड भागातील आनंदनगरात पोलिसांनी बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला. यानंतर या प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे विनोद ...
हिंगोली : बळसोंड भागातील आनंदनगरात पोलिसांनी बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला. यानंतर या प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे विनोद कुरुडे आणि इमरान खान या दोघांना अटक केली. या टोळीने बनावट नोटा अनेक जिल्ह्यांत चलनात आणल्याचा संशय आहे.
१७ सप्टेंबर
हिंगोलीच्या कार्यकारी अभियंत्यासह कंत्राटी सहायक चतुर्भुज
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील कनिष्ठ लेखाधिकारी पदाचा कारभार देण्यासाठी पाच हजारांची लाच मागणाऱ्या कार्यकारी अभियंता सविता शालगर व कंत्राटी सहायक विनोद धाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
२५ सप्टेंबर
ऐतिहासिक दसरा महोत्सव रद्द
२०२० मध्ये कोरोनाच्या संकटामुळे १८० वर्षांची परंपरा असलेला दसरा महोत्सव रद्द केला गेला.
३० सप्टेंबर
जिल्ह्यात ठिकठिकाणी ढोल बचाओ आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षणाला शिक्षण व शासकीय सेवेमध्ये स्थगिती देण्याचा निर्णय दिला. मराठा आरक्षणावरील स्थगिती त्वरित उठवावी व मराठा समाजबांधवांचे आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी जिल्ह्यात सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.