शासकीय कार्यालयांत शुकशुकाट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:21 AM2018-08-10T01:21:58+5:302018-08-10T01:22:20+5:30
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात महसूल कर्मचाºयांसह राज्य कर्मचारी संघटना गुरुवारीही सहभागी होती. यामुळे काही कार्यालयात शुकशुकाट होता. तर काही ठिकाणी बंदमुळे कुणीच न आल्याने शुकशुकाट असल्याचे दिसून येत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात महसूल कर्मचाºयांसह राज्य कर्मचारी संघटना गुरुवारीही सहभागी होती. यामुळे काही कार्यालयात शुकशुकाट होता. तर काही ठिकाणी बंदमुळे कुणीच न आल्याने शुकशुकाट असल्याचे दिसून येत होते.
जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयात कर्मचाºयांच्या संपाचा आज तिसरा व शेवटचा दिवस होता. यात बहुतांश कर्मचारी सहभागी होते. तर मराठा क्रांती मोर्चाच्या बंदमुळे कोणीच अभ्यागतही येत नसल्याने कामकाजावर परिणाम होण्याचा काही प्रश्नच नव्हता. तर जि.प., पं.स.सह इतरही शासकीय कार्यालयांमध्ये अघोषित सुटीसारखीच परिस्थिती होती. त्यातही अप-डाऊन करणाºया कर्मचाºयांना तर आज हजेरी लावणेही शक्य झाले नाही. बस, रेल्वेसह सर्व प्रकारची वाहतूक ठप्प होती. जिल्हाभरात जागोजाग असलेल्या आंदोलनांमुळे यात भर पडली होती.
शाळा-महाविद्यालये बंद
जिल्हाधिकाºयांनी सुटी जाहीर केल्यामुळे शाळा, महाविद्यालये, बँकाही बंद असल्याचे दिसून आले. तर नगरपालिका व इतर कार्यालयांतही हेच चित्र होते.