शासन हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:27 AM2018-10-01T00:27:52+5:302018-10-01T00:28:12+5:30
पंतप्रधान हे अन्याय अत्याचार, घोटाळे व देशात होणारा भ्रष्टाचार याबाबतीत काहीच बोलत नाहीत. शिवाय शासनाने आता हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली असून पंतप्रधान केवळ भाजपाचा प्रसार अधिक कसा होईल या विषयावर जास्त बोलतात. त्यामुळे संविधान बचाव देश बचाव मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पंतप्रधान हे अन्याय अत्याचार, घोटाळे व देशात होणारा भ्रष्टाचार याबाबतीत काहीच बोलत नाहीत. शिवाय शासनाने आता हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली असून पंतप्रधान केवळ भाजपाचा प्रसार अधिक कसा होईल या विषयावर जास्त बोलतात. त्यामुळे संविधान बचाव देश बचाव मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. अशी माहिती हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी रविवारी दिली.
यावेळी आ. रामराव वडकुते, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुनीर पटेल, जावेदराज आदी उपस्थित होते.
पुढे बोलतान फौजिया खान म्हणाल्या, सगळीकडे ईव्हीएम मशिनचा विरोध केला जात आहे. इतर देशांनीही ईव्हीएम मशिन सोडली आहे. मग भारतातच ईव्हीएम मशिनचा हट्ट का? आम्हाला विश्वास नाही, या मशिनवर; म्हणून या मशिनची दहन मोहीम राबविली जात आहे. बोफोर्सपेक्षाही मोठा घोटाळा एआ आहे, त्यामुळे त्याची किंमत स्ष्टपणे देशासमोर मांडावी, भाजपाकडे अफाट पैसा आला कोठून याची चौकशी होणे गरजेचे आहे, कोट्यवधी रूपये खर्च करून टोलेजंग भाजपाचे कार्यालय आज उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून धर्मा-धर्मांत भांडण लावणे हे एक षडयंत्र या सरकारकडून रचले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतभेद पसरविले जात असून हे देशाला घातक आहे. देशात ५०० पेक्षा जास्त लोकांना रस्त्यावर मारण्यात आले आहे. हा गंभीर विषय असल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. तसेच महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले असून आजही महिला असुरक्षित आहेत, परंतु सराकार महिलांवरील वाढत्या अत्याचाराकडे याकडे दुर्लक्ष करीत आहे. देशातील वाढता अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारामुळे देशात अराजकता पसरत असल्याचा आरोप फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.