राज्यपाल हिंगोलीला भेट देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:43 AM2018-08-03T00:43:35+5:302018-08-03T00:44:01+5:30
येथील आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुंबई येथे ३१ जुलै रोजी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना हिंगोली जिल्हा येथे येण्याची विनंती केली. त्यानुसार सप्टेंंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे मुटकुळे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुंबई येथे ३१ जुलै रोजी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना हिंगोली जिल्हा येथे येण्याची विनंती केली. त्यानुसार सप्टेंंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे मुटकुळे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सिंचन अनुषेशाची कामे तीव्र गतीने होण्यासाठी संबंधिताना निर्देश देण्याची मागणी केली. तसेच हिंगोली जिल्ह्याला भेट देण्याचीही विनंती केली असता, सप्टेंबरमध्ये नर्सी नामदेव व औंढा नागनाथ येथे भेट देऊ. जिल्ह्यातील सिंचन अनुशेषाचा कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिल्याचे आ. मुटकुळे यांनी कळविले. यावेळी माजी. आ. गजानन घुगे, माजी सभापती रामेश्वर शिंदे, गोवर्धन विरकुंवर, दाजीबा पाटील, हरिष नैनवाणी, रवि देवकर उपस्थित होते.