बसवरील सरकारच्या जाहिरातीला फासले काळे; वसमत आगारात मराठा आंदोलक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 12:51 PM2023-10-28T12:51:01+5:302023-10-28T12:51:26+5:30
यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी बसस्थानक दणाणून गेले.
वसमत: शहरातील बसस्थानकात आज सकाळी ११ वाजेदरम्यान मराठा आंदोलकांनी बसवरील सरकारच्या जाहिरातीवर काळे फासले. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी बसस्थानक दणाणून गेले. दरम्यान, तालुक्यात जिल्हा परिषद सर्कलनिहाय साखळी उपोषण करण्यात येत आहे.गावांगावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
आरक्षण मुद्द्यावरुन आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याची मागणी करत आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत बसस्थानकात आज सकाळी आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवासंदर्भात बसवर लावलेल्या जाहिरातीस आंदोलकांनी काळे फासले. बसस्थानकात अचानक आंदोलक दाखल झाल्याने प्रशासनाची धांदल उडाली होती.
दोन माजी मंत्र्यांना आरक्षणावरून जाब विचारला...
माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना वाई येथे तर माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांना जवळ्यात सकल मराठा समाज बांधवांनी आडवून त्यांना आरक्षणाबद्दल जाब विचारला होता.तालुक्यात आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस ज्वलंत होत चालला आहे.