औंढा नागनाथ येथे ग्रा.पं. निवडणुकीचे पहीले प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:30 AM2021-01-03T04:30:03+5:302021-01-03T04:30:03+5:30

औंढा नागनाथ तालुक्यातील एकूण ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये एकूण २६९ प्रभाग व एकूण २७५ मतदान केंद्र ...

G.P. at Aundha Nagnath. The first training of the election | औंढा नागनाथ येथे ग्रा.पं. निवडणुकीचे पहीले प्रशिक्षण

औंढा नागनाथ येथे ग्रा.पं. निवडणुकीचे पहीले प्रशिक्षण

Next

औंढा नागनाथ तालुक्यातील एकूण ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये एकूण २६९ प्रभाग व एकूण २७५ मतदान केंद्र आहेत. या निवडणूक प्रक्रियेत ५७१५२ पुरुष व स्री ५२९०७ असे एकूण ११००५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हे प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये घेण्यात आले. सकाळी १० ते १२ व दुपारी २ ते ४ असे घेण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी या प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीनचे प्रशिक्षण व मतदानाच्या दिवशी काय करायचे याविषयी सविस्तर माहिती दिली. गंगाधर साखरे मास्टर ट्रेनर यानीही सखोल मार्गदर्शन केले. पहिल्या व दुसऱ्या सत्रात अकराशे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. यावेळी नायब तहसीलदार सचिन जोशी, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांची उपस्थिती होती. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी शैलेश वाईकर, उमाकांत मुळे, अतुल हजारे, बालाजी सातव, शरद नाईकनवरे, ज्योती केजकर, उत्तम फाले, अनिल पाथरकर, उमेश साखरे, विशाल भुक्तर, संदीप मुंडे, कैलास जाधव, कुंडलिक हरकळ, विष्णू गिरी, सचिन दातार यांनी परिश्रम घेतले. फाेटाे नं.१४

Web Title: G.P. at Aundha Nagnath. The first training of the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.