औंढा येथे ग्रा.पं. निवडणुकीचे दुसरे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:22 AM2021-01-10T04:22:41+5:302021-01-10T04:22:41+5:30

औंढा नागनाथ तालुक्यातील एकूण ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये एकूण २६९ प्रभाग व एकूण २७५ मतदान केंद्र ...

G.P. at Aundha. Second election training | औंढा येथे ग्रा.पं. निवडणुकीचे दुसरे प्रशिक्षण

औंढा येथे ग्रा.पं. निवडणुकीचे दुसरे प्रशिक्षण

Next

औंढा नागनाथ तालुक्यातील एकूण ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये एकूण २६९ प्रभाग व एकूण २७५ मतदान केंद्र आहेत. या निवडणूक प्रक्रियेत ५७,१५२ पुरुष व स्त्री ५२,९०७ असे एकूण १,१०,०५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हे प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी या प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीनचे प्रशिक्षण व मतदानाच्या दिवशी काय करायचे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच व्हिडिओच्या माध्यमातूनही माहिती सांगितले. प्रशिक्षक गंगाधर साखरे यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणास तहसीलदार कृष्णा कानगुले, नायब तहसीलदार सचिन जोशी, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांची उपस्थिती होती. या दोन्ही सत्रात बाराशे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी शैलेश वाईकर, उमाकांत मुळे, बाळू सातव, हनुमंत शेळके, शरद नाईकनवरे, ज्योती केजकर, उत्तम फाले, अनिल पाथरकर, आनंद दातार सह मंडळ अधिकारी व तलाठी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: G.P. at Aundha. Second election training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.