शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या 'एनओसी'नंतरच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:56+5:302021-07-11T04:20:56+5:30
हिंगोली : कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यास शासनाने सहमती दिली असली तरी ग्रामपंचायत व पालकांनी परवानगी दिली, तरच शाळा ...
हिंगोली : कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यास शासनाने सहमती दिली असली तरी ग्रामपंचायत व पालकांनी परवानगी दिली, तरच शाळा सुरू होणार आहेत. जिल्ह्यात अद्याप एकाही ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविला नसल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांचे शाळा कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. जिल्ह्यातील शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष वर्ग भरविले जात नाहीत. सध्या जिल्ह्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. दोन दिवस तर एकही रुग्ण आढळून आला नाही. सध्या १० वर्षापेक्षा कमी वयोगटाच्या मुलांना कोरोना संसर्ग होण्याची सर्वात कमी शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच १८ वयापर्यंतच्या मुलांना सध्या तरी कोरोना संसर्ग होण्याची शक्यता कमीच आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी एक ते दीड वर्षापासून घरीच आहेत. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे कठीण होऊन बसेल. त्यात मुले घरी राहत असल्याने विविध दुष्परिणामाला सामोरे जात आहेत. सध्या कोरोना संसर्ग कमी झाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता कोरोनामुक्त गावात पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. परंतु, ग्रामपंचायत व पालकांची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे, तसेच वर्ग सुरू झाल्यानंतरही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक करण्यात आले आहे.
पालकांचीही हा
शाळा बंद असल्याने मुले घरी राहून कंटाळली आहेत, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कोरोना संसर्ग कमी झाला असून शिक्षण विभागाने शाळा सुरू कराव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
- सुरेश पाईकराव
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुले मोबाईलमध्ये व्यस्त राहत आहेत. त्यामुळे डोळ्याचे आजार व इतर समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यास मदत होईल.
-दीपक पतंगे
एकाही ग्रामपंचायतीचा ठराव नाही
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त केली जात आहे. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा कोरोना संसर्ग झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्यासंदर्भाचा ठराव शिक्षण विभागाकडे पाठविला नसल्याची माहिती आहे.
शाळा बंद असल्याने होताहेत दुष्परिणाम
शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी राहत आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे. त्यात सामाजिक कौशल्याचे नुकसान, मोबाईल, इंटरनेटचा गैरवापर, मानसिक तणाव, चिडचिडेपणा वाढत आहे. त्यात बालविवाह, बालमजुरीचे प्रमाणही वाढत असल्याचे समोर आले आहे. मुलींना शेती कामात ठेवणे आदी नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू कराव्यात, असा सूर पालकांतून उमटत आहे.
जिल्ह्यातील एकूण शाळा - १३२५
शासकीय -८८६
अनुदानित -२३४
विनाअनुदानित -२०५
कोरोनामुक्त गावे -