हरभऱ्याचे दर घसरले; हळदीचे दर वाढताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:33 AM2021-05-25T04:33:32+5:302021-05-25T04:33:32+5:30

येथील भुसार मार्केट मोंढ्यामध्ये सोमवारी सकाळपासूनच हरभऱ्याची मोठी आवक होत असल्याचे दिसून येत होते. आज जवळपास पाचशे क्विंटलपेक्षा जास्त ...

Gram prices fell; Turmeric prices are rising | हरभऱ्याचे दर घसरले; हळदीचे दर वाढताहेत

हरभऱ्याचे दर घसरले; हळदीचे दर वाढताहेत

Next

येथील भुसार मार्केट मोंढ्यामध्ये सोमवारी सकाळपासूनच हरभऱ्याची मोठी आवक होत असल्याचे दिसून येत होते. आज जवळपास पाचशे क्विंटलपेक्षा जास्त माल विक्रीस आला होता. काही दिवसांपूर्वी हरभाऱ्याचे दर साडेसात हजार रुपयांवर गेले होते. तेव्हा आवक मात्र कमी होती. आता खरिपाच्या तोंडावर शेतकरी बाजारात माल आणत असला तरीही हरभऱ्याचे दर मात्र पडले असल्याचे दिसून येत आहे. आज चार हजार सातशे रुपये ते पाच हजार शंभर रुपयांपर्यंतचा दर हरभऱ्याला मिळाला. त्यामुळे याआधीच हरभऱ्याची विक्री केली असती तर एवढा तोटा सहन करावा लागला नसता, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून ऐकायला मिळत होत्या, तर सध्या हरभऱ्याचे दर वाढण्याची शक्यता नसून आणखी काही काळ वाटप पाहिल्यास दर वाढतील, असे चित्र आहे. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांना खरिपासाठी पैशांची गरज असल्याने थांबणे शक्य दिसत नाही. पिकाची विक्रमी आवक झालेली आहे. शहरांमध्ये असलेल्या भुसार मार्केटमध्ये सोमवारी रोजी सकाळपासून दुपारपर्यंत जवळपास सातशे हरभरा पोत्याची आवक झालेली आहे. पेरणीच्या ताेंडावर बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागत आहे.

दरम्यान, आज हळदीच्या मार्केटमध्येही जवळपास साडेचार हजार क्विंटलची आवक झाली होती. हळदीचे दर सध्या पूर्वीपेक्षा थोडे वधारले आहेत. सध्या सहा हजार पाचशे रुपयांपासून ते सात हजार दोनशे रुपयांपर्यंत हळदीला भाव मिळाला आहे. यंदा सुरुवातीला हळदीचे दर साडेपाच हजारांपर्यंत खाली उतरले होते. त्यामुळे दीड हजाराची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना खरिपाच्या तयारीसाठी माल काढावा लागत असून आणखी भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Gram prices fell; Turmeric prices are rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.