हरभरा हमीभाव केंद्र सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:18 AM2018-02-20T01:18:44+5:302018-02-20T01:18:47+5:30
जिल्ह्यात यंदा हरभºयाचे पीक मोठ्या प्रमाणात होते. मात्र खाजगी बाजारात हरभºयाला भाव नसल्याची शेतकºयांची ओरड लक्षात घेता शासनाकडून हरभरा हमीभावाने खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून तो मंजुरीत असल्याने शेतकºयांनी हमी केंद्रावरच हरभरा विकण्याचे आवाहन आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात यंदा हरभºयाचे पीक मोठ्या प्रमाणात होते. मात्र खाजगी बाजारात हरभºयाला भाव नसल्याची शेतकºयांची ओरड लक्षात घेता शासनाकडून हरभरा हमीभावाने खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून तो मंजुरीत असल्याने शेतकºयांनी हमी केंद्रावरच हरभरा विकण्याचे आवाहन आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले.
यंदा जिल्ह्यात हरभºयाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. काहींची काढणी झाली नाही तोच गारपिटीने दणका दिला. मात्र ज्यांनी आधी पीक काढले, अशांचा माल आता विविध ठिकाणी खाजगी व्यापाºयांना विकला जात आहे. तीन ते साडेतीन हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मात्र हमीभाव त्यापेक्षा हजार रुपयांनी जास्त आहे.
मुटकुळे म्हणाले, बोनससह हरभºयाचा केंद्राचा हमीभाव ४४00 रुपये एवढा आहे. त्यामुळे शेतकºयांनी काहीकाळ प्रतीक्षा केल्यास हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार आहे. यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी बोलणे झाले. देशमुख यांनी सांगितले की, याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच संबंधित खात्याचे सचिवही दिल्लीत तळ ठोकून आहेत. बुधवारपर्यंत याला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर खरेदीचा मार्ग मोकळा होईल, असेही ते म्हणाले.