ग्रामसेवक युनियनचे एकदिवसीय धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:10 AM2018-07-12T00:10:27+5:302018-07-12T00:10:55+5:30
विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जि.प.चे पदाधिकारी, सदस्य तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देत ग्रामसेवकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जि.प.चे पदाधिकारी, सदस्य तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देत ग्रामसेवकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
कळमनुरीच्या गटविकास अधिकाºयांची बदली करावी, प्रलंबित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण करावे, डी.सी.पी.एस. कपातीच्या रकमा खात्यावर जमा कराव्यात, १२ व २४ वर्षाची कालबद्ध पदोन्नती द्याव्यात, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बंद केलेल्या वेतनवाढी त्वरित सुरू कराव्यात, स्थानिक निधी लेखा परीक्षण चुकीच्या पद्धतीने झाल्याने २५ हजारांचा लावलेला दंड माफ करावा, जीएसटी कर प्रणाली व ई-टेंडर प्रशिक्षण द्यावे, कंत्राटी ग्रामसेवकांना कायम करावे, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्यावी, मासिक वेतन वेळेवर द्यावे, भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे मार्गी लावावीत इ. मागण्यांसाठी दिवसभर हे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटना पदाधिकाºयांनी भाषणे केली. यात शासन व प्रशासन वारंवार आश्वासने देत असले तरीही या मागण्या पूर्ण होत नसल्याचा आरोप करण्यात ंआला आहे. यातील अनेक मुद्दे स्थानिक स्तरावर निकाली काढण्यासारखे असले तरीही त्यात नंतर लक्ष घातले जात नाही. त्यामुळे ग्रामसेवकांना नाईलाजाने हे आंदोलन करावे लागत असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, उपाध्यक्ष मंचक भोसले, सरचिटणीस राजेश किलचे, देवराव इंगोले, शेख शैनुद्दीन, सोळंके, गिरीश मठपती, ज्ञानेश्वर गुडेवार, भंडारी, व्ही.एस. होडबे, लक्ष्मीकांत खोडके, अरुण वाबळे, आडे, सावित्रा जाधव, विजय मगर, दिलीप कंधारे, सुरेश झिंजाडे, शिवाजी खरात, भगवान भोसले, भगवान झरकर, महेश थोरकर आदींसह ग्रामसेवक हजर होते.
आंदोलक ग्रामसेवकांची सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, गोपू पाटील, संजय दराडे, दिलीप घुगे, डी. वाय. घुगे आदींनी भेट घेत पाठिंबा दिला. उपाध्यक्ष पतंगे यांनी १३ जुलैला बैठक घेवून ग्रामसेवकांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना प्रशासनातील संबंधित अधिकाºयांना दिल्या.