अवकाळीमुळे शेतीचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:03 AM2019-04-06T00:03:45+5:302019-04-06T00:04:00+5:30
जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यात कैऱ्या गळून पडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यात कैऱ्या गळून पडल्या. अनेक ठिकाणी झाडे उन्मळली. महावितरणचे खांब पडले. प्रशासनाने तहसीलकडून शेती नुकसानीचा अहवाल मागविला आहे.
गोरेगाव परिसरात नुकसान
गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तुफान वाºयासह तब्बल दीड तास गारांसह पाऊस पडला. यामुळे काढणीस आलेल्या टोळ कांदा बियाणे पिकाची प्रचंड नासाडी झाली. वादळी वाºयामुळे मोठी झाडे कोसळली असून आंब्याच्या कैºया पूर्णत: गारांमुळे पडून नुकसान झाले आहे. शिजवून वाळू घातलेल्या हळदीचे अचानक झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
कनेरगाव वीज खंडित
कनेरगाव नाका : ४ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून असून कनेरगाव, फाळेगाव देवठाणा भोयर कानरखेडा बु., कानरखेडा खु., मोप आदी भागातील शेतकºयांचे केळीचे तसेच सत्र्यांच्या बागाचे व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
फाळेगाव येथील डॉ. सारडा यांच्या शेतातील शाळेची संरक्षक भिंत कोसळली. तर शेतातील आंब्याचे नुकसान झाले आहे. वादळी वाºयामुळे वीजपुरवठा खंडित झाला सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत नव्हता. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला अन् विहिरीवर जावून पाणी आणावे लागले.
करवाडीत बकºयाचा मृत्यू
नांदापूर : कळमनुरी तालुक्यातील नांदापूरअंतर्गत असलेल्या करवाडी येथे ४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून वादळी वारे पाऊस सुरू झाला. वाºयामुळे शेतकºयांनी एकच धावपळ सुरू झाली. शेतकरी केशव भुगाजी कºहाळे हे काल शेतामध्ये शेळ्या चारत होते. अचानक वारे आणि पाऊस सुरू झाला आणि बकºयाचा जागीच मृत्यू झाला. या शेतकºयाचे अंदाजे तीन ते चार हजारांचे नुकसान झाले.
्रपानकनेरगावात पाऊस
पानकनेरगाव : येथील परिसरात वातावरणात बदल होऊन गुरुवारी सायंकाळी वीजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयामुळे झाडे उन्मळून पडली. काहींच्या घरावरील टीनपत्रे उडाले. आंब्याचे नुकसान झाले. वाळत ठेवलेली हळद झाकण्यासाठी शेतकºयांची धांदल उडाली. शुक्रवारीही ढगाळ वातावरण कायम होते. बळीराजा हतबल झाला आहे.