हिंगोलीत अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:32 AM2021-09-26T04:32:04+5:302021-09-26T04:32:04+5:30
यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर माथाडी कामगारांचे आराध्य दैवत, ...
यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर माथाडी कामगारांचे आराध्य दैवत, मराठा आरक्षणासाठी प्रथम बलिदान देणारे क्रांतिसूर्य अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी खासदार ॲड. शिवाजी माने, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनीष आखरे, मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढोकर पाटील, युवकचे विभागीय अध्यक्ष भूषण देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष ज्योतीताई कोथळकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव लोंढे पाटील, कल्याण देशमुख, खंडेराव सरनाईक, ॲड. अमोल जाधव, युवक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे, पप्पू चव्हाण, दिलीप घ्यार, जि. प.चे माजी सभापती संजय देशमुख, ॲड. उल्हास पाटील, माधवीताई पाटील गोरेगावकर, छायाताई मगर, राधिकाताई देशमुख, भारतीय मराठा महासंघाचे युवा जिल्हाप्रमुख गणेश शिंदे, ॲड. नामदेव सपाटे, सचिन शिंदे, बाजार समितीचे संचालक प्रशांत सोनी, वैभव शिंदे, शिवाजी सरकटे, विलास पाटील, चांदू लोंढे, प्रतापराव वानखेडे, संदीप बोरकर आदी सकल मराठा समाजबांधव व शिवप्रेमींची मोठ्या संख्येंने उपस्थिती होती.