हमीभाव केंद्राला मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:42 AM2018-10-10T00:42:05+5:302018-10-10T00:42:22+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे शासनाचे हमीभव खरेदी केंद्र अद्यापही सुरु झाले नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे शासनाचे हमीभव खरेदी केंद्र अद्यापही सुरु झाले नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
सोयाबीन, मूग, उडीद आदी शेतमालास राज्य शासनाने हमीभाव जाहीर केला. हमीभाव खरेदी केंद्रही सुरू करणार असल्याचे अश्वासन दिले. मात्र अद्यापही खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. तर मूग, उडीद या पिकांची आॅनलाईन नोंदणीस सुरुवात न झाल्याने शेतकरी शेतमाल कवडीमोल दराने व्यापाऱ्यांना विक्री करत आहेत.
गतवर्षी राज्य शासनाने जवळाबाजार येथे हमी भाव केंद्र सुरू होते. यावर्षी सुद्धा हमी भाव खरेदी केंद्र सुरू करणार असल्याचे जाहीर केले. राज्य शासनाने २५ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या काळात मूग, उडीद या पिकांच्या खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीची मुदत ९ आॅक्टोबरपर्यंत दिली. तरीही आॅनलाईन नोंदणी केंद्र जवळाबाजार येथे सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना कवडीमोल दराने मुगाची विक्री करावी लागली. यामध्ये मुगाचे हमीभाव ६ हजार ९७५ तर उडीदासाठी ५ हजार ६०० जाहीर केला आहे. मात्र हमी भाव खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी शेतकºयांना ४ हजार रुपये कवडीमोल दराने व्यापाºयांना विक्री करत आहेत. याचा मोठा फटका शेतकºयांना सहन करावा लागत असल्याने शासनाने तत्काळ केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आॅनलाईन नोंदणीसाठी येथील खरेदी-विक्री केंद्रावर शेतकरी चकरा मारुन हैराण झाले आहेत. त्याचबरोबर आदी जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. यावर्षीचा खरीप पेरा महसूल विभागाने अद्यापही सातबारावर नोंदविला नाही. त्यामुळे पीक असूनही शेतकरी अडचणीत सापडला आहे. जाचक अटी व वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे हमीभाव केंद्राकडे नाविलाजाने पाठ फिरवून व्यापाºयांना कवडीमोल दराने मूग, उडीद व सोयाबीनची विक्री शेतकºयांना करावी लागत आहे.