मासिक आढावा बैठकीत अधिका-यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:41 AM2018-02-24T00:41:30+5:302018-02-24T00:41:34+5:30
येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात २३ फेबु्रवारी रोजी पोलीस अधिकाºयांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात २३ फेबु्रवारी रोजी पोलीस अधिकाºयांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन केले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत प्रलंबित असलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती व आगामी साजरे करण्यात येणारे सण व उत्सवातील पोलीस बंदोबस्त यासंदर्भात गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले. आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी, राहुल मदने, शशीकिरण काशिद, सिद्धेश्वर भोरे, पोनि जगदीश भंडरवार, पोनि मारोती थोरात, पोनि अशोक मैराळ, पोनि मधुकर कारेगावकर, केंद्रे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी हजर होते. गुंजाळ यांनी यावेळी पोलीस अधिकाºयांना येणाºया अडचणी व समस्या समजून घेतल्या. विविध पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेले गुन्हे, तसेच प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेत पोलीस अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या. आगामी होणारे सण व उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी पोलीस प्रशासनाने कोणती खबरदारी घेतली पाहिजे, यावेळी अधिकारी व कर्मचाºयांचे कर्तव्य यासह विविध विषयावर माहिती सांगण्यात आली.
नऊ जणांवर गुन्हा
हिंगोली - पोलिसांनी गुरूवारी तीन ठिकाणी छापे मारून जुगार खेळणाºया नऊ जणांवर कारवाई केली. आरोपींकडील जुगाराच्या साहित्यासह २४ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अल्ताफखान खाजाखान, जफिक नाईक मकसूद अहेमद, आनंदा शेकुराव शेळके, रामजी असोले, हावसाजी पोटे, रहेमतखान अमजदखान यांच्यासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.