रेसिंग ‘डे’ निमित्त मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:48 AM2019-01-04T00:48:36+5:302019-01-04T00:49:01+5:30
महाराष्ट्र पोलीस रेसिंग ‘डे’ निमित्त २ ते १९ जानेवारीदम्यान जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने हिंगोली येथील आदर्श कॉलेज येथे सायबर क्राईम या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्र पोलीस रेसिंग ‘डे’ निमित्त २ ते १९ जानेवारीदम्यान जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने हिंगोली येथील आदर्श कॉलेज येथे सायबर क्राईम या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. तसेच सायबर क्राईम बद्दल विद्यार्थ्यांना माहिती देत जनजागृती केली. पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनायक लंबे, अरक पठाण, पोहेकॉ जयप्रकाश झाडे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कळमनुरीत कार्यक्रम
कळमनुरी : पोलिसांच्या रेसिंग डे निमित्त येथील पोलीस ठाण्याच्या वतीने २ जानेवारी रोजी म. ज्योतिबा फुले विद्यालयात विद्यार्थ्यांना स्वरक्षण कायदा कर्तव्य शस्त्राची माहिती तसेच स्पर्धा परीक्षेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोनि जी.एस. राहिरे, फौजदार शिवसांब घेवारे यांनी शस्त्राबद्दल व कायद्याबाबत माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक पी.के. राठोड, उपप्राचार्य बी.पी. पतंगे, ओढणे, सपोउपनि आर.पी. जाधव, उरेवार, सूर्यवंशी, गरड, अमोल लासीनकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आतापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित आहे, असे सांगितले.