कृषी विज्ञान केंद्रात ज्वारी, भाजीपाल्याबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:32 AM2021-08-27T04:32:43+5:302021-08-27T04:32:43+5:30
कृषी विज्ञान केंद्र, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि कृषी मंत्रालयाच्या ‘किसानों के लिए खाद्य एवं पोषण’ या ...
कृषी विज्ञान केंद्र, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि कृषी मंत्रालयाच्या ‘किसानों के लिए खाद्य एवं पोषण’ या विषयावर गुरुवारी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी वारंगा येथील प्रगतीशील शेतकरी आबासाहेब कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी रत्न पुरस्कार प्राप्त गोरखनाथ हाडोळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना गोरखनाथ हाडोळे, प्रा. राजेश भालेराव, प्रा. अजयकुमार सुगावे, डॉ. कैलास गिते यांनी सेंद्रीय शाळू ज्वारी व भाजीपाल्यांची तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात तोंडापूर येथील महिला शेतकरी वंदना थोरात यांनी स्वत:च्या शेतामधील सेंद्रीय शेतीचा अनुभव सांगितला.
प्रास्ताविकात डॉ. पी. पी. शेळके, सूत्रसंचालन विजय ठाकरे यांनी केले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेतकरी बांधव व महिला उपस्थित होत्या.