न.प.च्या सभेत गुंठेवारीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:31+5:302021-07-14T04:34:31+5:30

या सभेत न.प. फंडांतर्गतच्या कामांचा खर्च, न.प. हद्दीतील गुंठेवारी प्रकरणे नियमाधिन करणे, ही प्रकरणे करण्यासाठी विकास कर, प्रशमन शुल्क ...

Gunthewari's proposal in the meeting of NP | न.प.च्या सभेत गुंठेवारीचा प्रस्ताव

न.प.च्या सभेत गुंठेवारीचा प्रस्ताव

Next

या सभेत न.प. फंडांतर्गतच्या कामांचा खर्च, न.प. हद्दीतील गुंठेवारी प्रकरणे नियमाधिन करणे, ही प्रकरणे करण्यासाठी विकास कर, प्रशमन शुल्क आदी निश्चित करणे, हिंगोली शहरातील कराचे सर्वेक्षण करून, आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करून, कचरा संकलन व वाहतुकीकरण देखरेख नियंत्रणाचा प्रस्तावही चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. हिंगोली शहरातील जातीवाचक १६ वस्त्यांची नावे बदलण्याचा ठरावही ठेवला आहे. सफाई कामगारांच्या वारसाची तीन प्रकरणेही विचारार्थ ठेवली आहेत. क्रीडा कार्यालयाजवळील चौकास स्वातंत्र्यवीर ॲड.भाई कोतवाल यांचे नाव देण्याचा ठरावही ठेवला आहे.

शहरातील विविध भागांतील अनधिकृत बांधकामांबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, यापूर्वीही गुंठेवारीची काही प्रकरणे दाखल झालेली आहेत. आता नव्या २०२१च्या आदेशामुळे आणखी काही बांधकामांचा प्रश्न मोकळा होणार आहे. या नव्या निर्णयानुसार निर्णय घेण्यासाठी नगरसेविका स.नाजनीन जावेद राज यांनीही निवेदन दिले होते.

Web Title: Gunthewari's proposal in the meeting of NP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.