अर्ध्यावर शेतकरी विम्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:15 AM2017-08-01T00:15:28+5:302017-08-01T00:15:28+5:30
जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेवटच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत हे चित्र होते. तर राष्ट्रीयीकृत बँकांनीही आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत विमा स्वीकारला. मात्र हे प्रमाण तुरळक आहे. गेल्यावर्षी ३.५0 लाख शेतकºयांनी पीकविमा काढला होता. यंदा सव्वालाखही शेतकºयांचा विमा स्वीकारणे यंत्रणांना शक्य झाले नाही.
हिंगोली : जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेवटच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत हे चित्र होते. तर राष्ट्रीयीकृत बँकांनीही आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत विमा स्वीकारला. मात्र हे प्रमाण तुरळक आहे. गेल्यावर्षी ३.५0 लाख शेतकºयांनी पीकविमा काढला होता. यंदा सव्वालाखही शेतकºयांचा विमा स्वीकारणे यंत्रणांना शक्य झाले नाही.
हिंगोली जिल्ह्यात खरीप २0१५ हंगामात २ लाख ५८ हजार ३0९ शेतकºयांनी १ लाख ६0 हजार ५३३ हेक्टरवरील विविध पिकांचा विमा काढला होता. यात २.३४ लाख शेतकºयांना ११४.६८ कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली होती. तर २0१५-१६ च्या रबी हंगामात ३१ हजार शेतकºयांनी २५ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा काढला होता. यात २७ हजार शेतकºयांना ९.६0 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती.यापैकी ६.५0 कोटींचे वाटप झाले. तर खरीप हंगाम २0१६-१७ साठी ३ लाख ५५ हजार १६६ शेतकºयांनी १.८५ लाख हेक्टरचा विमा काढला होता. ८५ हजार ७५ शेतकºयांना २८.५0 कोटींचा विमा मंजूर झाला होता. १३.७0 कोटींचे प्रत्यक्ष वाटप झाले.
यंदा शेतकºयांचा पीकविमा भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांना त्यासोबतच विमा काढून मिळत आहे. असे सर्व बँकांचे २७ हजार ८७0 खातेदार २९ जुलैपर्यंत होते. यात आणखी हजार जणांची संख्या वाढू शकते. तर एकट्या मध्यवर्ती बँकेने २२२९४ जणांना पीककर्ज दिलेले आहे.
आॅनलाईनवरही २१ जुलैपर्यंत १६ हजार शेतकºयांनी पीकविमा भरला होता. त्यानंतर रात्रंदिवस काम झाल्याने २0 हजारांपर्यंत नव्या शेतकºयांनी विमा काढला असण्याची शक्यता आहे. तर बँकांनी विमा स्वीकारण्याच्या सूचना दिल्यानंतर मध्यवर्ती बँकेने जवळपास ३५ ते ४0 हजार बिगर कर्जदार शेतकºयांचा विमा स्वीकारला असावा, असा अंदाज आहे. तर राष्ट्रीयीकृत बॅकांनी विमा स्वीकारल्याचा आकडा तर सोडा ही माहितीही द्यायला कुणी तयार नाही. मात्र हा आकडा दहा हजारांच्या पुढे जाईल, याची सुतराम शक्यता नाही.
शेवटच्या दिवसापर्यंत महा-ई-सेवा केंद्रांना सर्व्हरच्या समस्येने मोठा त्रास सहन करावा लागला. तर बँकांना ऐनवेळी आदेश आल्याने केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवरच सर्व भार पडल्याचे चित्र होते.