निम्मी गावठाण अतिक्रमणे नियमानुकूलतेच्या मंजुरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:21 PM2019-11-18T23:21:34+5:302019-11-18T23:22:21+5:30

शासनाने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे आॅनलाईन प्रस्ताव दाखल केलेल्या तीन हजार तीनशेपैकी जवळपास दीड हजार अतिक्रमणे नियमानुकूलतेच्या मंजुरीत आहेत.

 Half of the Gauthan encroachments allowed for regularization | निम्मी गावठाण अतिक्रमणे नियमानुकूलतेच्या मंजुरीत

निम्मी गावठाण अतिक्रमणे नियमानुकूलतेच्या मंजुरीत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शासनाने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे आॅनलाईन प्रस्ताव दाखल केलेल्या तीन हजार तीनशेपैकी जवळपास दीड हजार अतिक्रमणे नियमानुकूलतेच्या मंजुरीत आहेत. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर एवढ्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली असून शासनाची मंजुरी मिळणे तेवढे बाकी आहे.
गावठाणच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ देताना मोठी अडचण येत होती. त्यामुळे शासनाने ठरावीक निकष लावून अशा प्रकारच्या अतिक्रमणांची आॅनलाईन माहिती ग्रामसेवकांमार्फत मागविली होती. यात पात्र ३ हजार तीनशे प्रस्ताव आॅनलाईन करण्यात आले आहेत. या प्रस्तावांची गटविकास अधिकारी, पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदींमार्फत पडताळणी करण्यात आली. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवण्यात येत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात अशा अतिक्रमणांचे आॅनलाईन प्रस्ताव औंढा ३३५, वसमत ११८४, हिंगोली ५५६, कळमनुरी ३६८ तर सेनगाव ९४७ असे एकूण ३३९0 एवढे आहेत. यापैकी जवळपास दीड हजार प्रस्तावांना शासन मंजुरीसाठी सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी हिरवा कंदिल दाखविला आहे. यामध्ये ५00 स्क्वे.फुटाच्या आतील ८१२ प्रस्तावांना कोणतेही शुल्क नसल्याने त्याला लागलीच पाठविण्यात आले आहे. तर जवळपास अडीचशे ते तीनशे प्रस्ताव हे ५00 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त अतिक्रमणाचे आहे.
या जागेला बाजार भावाप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे असे प्रस्ताव ही रक्कम भरल्यानंतरच मंजुरीच्या प्रक्रियेत येणार आहेत. हे प्रस्ताव मंजुरीत असले तरीही ही प्रक्रिया होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यानंतर शासन स्तरावर प्रक्रिया होईल.

Web Title:  Half of the Gauthan encroachments allowed for regularization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.