दोन वर्षांपर्वीच केली हाॅलमार्किंगला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:21 AM2021-07-01T04:21:37+5:302021-07-01T04:21:37+5:30
हिंगोली : दागिन्यांना हॉलमार्किंग केल्यास त्यात पारदर्शकता येते. ग्राहकांना विश्वास बसतो. त्यामुळे हिंगोलीतील १० टक्के सराफांनी दोन वर्षापूर्वीच हॉलमार्किंग ...
हिंगोली : दागिन्यांना हॉलमार्किंग केल्यास त्यात पारदर्शकता येते. ग्राहकांना विश्वास बसतो. त्यामुळे हिंगोलीतील १० टक्के सराफांनी दोन वर्षापूर्वीच हॉलमार्किंग सुरू केली आहे, अशी माहिती सराफा असोसिएशचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ यांनी दिली.
जुने दागिने हॉलमार्क नसले तरी ग्राहकांनी घाबरण्याचे काही एक कारण नाही. केंद्र शासनाची नियमावली ग्राहकांना नसून केवळ ती विक्रेत्यांसाठी आहे. हॉलमार्क नसलेली जुनी सुवर्ण आभूषणे परत खरेदी करण्याची मुभाही सराफांना देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्यांचे हॉलमार्क नसलेली दागिनेही विकता येणार आहेत. जुने दागिने आहे त्या स्थितीत किंवा ते वितळवून पुन्हा नवीन दागिने घडवून त्यांना हॉलमार्क करता येऊ शकते, असेही सराफ यांनी सांगितले.
कोरोना महामारीमुळे दीड वर्षापासून सराफा बाजारावर चांगलाच परिणाम झाला आहे. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. नाही म्हटले तरी ७५ टक्के तोटा दीड वर्षापासून सराफा व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. ६ जूनपासून सराफांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, ‘डेल्टा प्लस’च्या निर्बंधामुळे पुन्हा ४ वाजेपर्यतच दुकाने उघडी ठेवण्याचे शासनाने आदेश काढले आहेत. खरे पाहिले तर सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडे ठेवण्याची वेळ दिल्यास सर्वच व्यापाऱ्यांसाठी हे सोयीचे ठरणार आहे. ६ जूनपासून सोन्याचा भाव ४८ हजार ४०० ते ५० हजार ६०० रुपये तोळा असा राहिला आहे. तर ६० हजार ५०० ते ७० हजार ७०० रुपये किलो या दराने चांदी विकली जात आहे.
कारागिरांची उणीव भासू लागली
कोरोना महामारीमुळे सर्वच सराफा दुकानातील बंगाली कारागीर आपापल्या गावी गेले आहेत. अजूनही हे बंगाली कारागीर परत आले नाहीत. त्यामुळे त्यांची उणीव भासू लागली आहे. हिंगोली जिल्हा मराठवाड्यात लहान असला तरी सोन्या-चांदीसाठी चांगली बाजारपेठ आहे. त्यामुळे गावोगावचे नागरिक सोने-चांदी खरेदीसाठी हिंगोली येेेथेच येतात. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्वच सराफांनी दागिन्यांवर हॉलमार्किंग करून घेणे गरजेचे आहे. यावर्षी विवाहाच्या तिथी भरपूर होत्या. परंतु, कोरोनामुळे आम्हाला सोन्या-चांदीची दुकाने उघडता आली नाहीत. त्यामुळे व्यापारावर चांगलाच परिणाम झाला.
-सुधीरअप्पा सराफा व्यापारी
फोटो ९