हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:33 AM2021-08-19T04:33:10+5:302021-08-19T04:33:10+5:30
आजमितीस शहरात ६० हॉटेल्स असल्या तरी कोरोनाच्या प्रादुर्भामुळे बहुतांश हाॅटेल उघडले जात नाहीत. एवढे असतानाही दोनशेच्या जवळपास कर्मचारी सद्य:स्थितीत ...
आजमितीस शहरात ६० हॉटेल्स असल्या तरी कोरोनाच्या प्रादुर्भामुळे बहुतांश हाॅटेल उघडले जात नाहीत. एवढे असतानाही दोनशेच्या जवळपास कर्मचारी सद्य:स्थितीत हाॅटेलात काम करीत आहेत. कोरोना अजून संपला नाही. त्यामुळे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग करीत असले तरी अजूनही हाॅटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नाही. तसेच रस्त्यावरील टपरीधारकांचे लसीकरण बाकी आहे. टपरीधारकांना तर लसीकरण काय असते हेही माहिती नाही.
कामगारांचा आधी विचार करावा...
जिल्ह्यात सद्य:स्थितीत साठ जवळपास हाॅटेल्स शहरात आहेत. अजूनही काही हाॅटेलातील कर्मचाऱ्यांना लसीकरण करता आले नाही. सकाळी उठून ते कामावर येतात. घरी जाईपर्यत त्यांना रात्रच होते.
-आशिष शर्मा, हाॅटेल संघटना अध्यक्ष
नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे...
१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या हेल्थकेअर व फ्रंटलाईन वर्कर लसीकरण करत आहेत. सर्व दुकानदार, हाॅटेल व्यावसायिक, कामगारांनी लसीकरण करून घ्यावे.
-डाॅ. प्रेमकुमार ठोंबरे, जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी, हिंगोली
रस्त्यांवरील टपऱ्यांवर आनंदी आनंदच...
संसाराचा गाडा चालविण्यासाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी अनेक बेरोजगारांनी चहाच्या टपऱ्या टाकल्या आहेत. परंतु, आजमितीस अनेकांचे लसीकरण बाकी राहिले आहे.
लसीकरण सुरू होऊन आठ महिने लोटले तरी टपरीधारक मात्र लसीकरणापासून कोसो दूरच असल्याचे पहायला मिळत आहे. एकंदर शहरातील रस्त्यांवर आनंदी आनंद असल्याचे पहायला मिळत आहे.