बारावीचे १३ कॉपीबहाद्दर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:16 AM2019-03-10T00:16:42+5:302019-03-10T00:17:51+5:30
सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. येथील अमृतराव पाटील परीक्षा केंद्रावरील १३ कॉपी बहाद्दरांना ९ मार्च रोजी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी रस्टीकेट केले.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. येथील अमृतराव पाटील परीक्षा केंद्रावरील १३ कॉपी बहाद्दरांना ९ मार्च रोजी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी रस्टीकेट केले.
२१ फेबु्रवारीपासून जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून धडपड केली जात असली तरी, अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर सर्रासपणे कॉप्यांचा सुळसुळाट असल्याचे चित्र आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी भरारी पथकाद्वारे केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत. यावेळी पेपर सोडविताना नक्कल करणाºया विद्यार्थ्यांना थेट रस्टीकेट केले जात आहे. ९ मार्च रोजी बारावी अर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. यावेळी वरिष्ठ अधिकाºयाचे भरारी पथकाने सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. येथील एका परीक्षा केंद्रास भेट दिली असता, या ठिकाणी विद्यार्थी नक्कला करीत असल्याचे निदर्शनास आले. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी १३ विद्यार्थ्यांना रस्टीकेट केले आहे. यापुर्वीही अनेक विद्यार्थ्यांना नक्कला करताना पकडल्याने भरारी पथकाने त्यांना रस्टीकेट केले होते.
३३४३ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
जिल्ह्यातील ३४ केंद्रावरून बारावीच्या ३४९४ विद्यार्थ्यांपैकी ३३४३ विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र या विषयाचा पेपर दिला. तर १५२ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर असल्याची माहिती परीक्षा विभागातील वडकुते यांनी दिली. सेनगाव तालुक्यातील परीक्षा केंद्रांना शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी भेटी दिल्या.