पैशासाठी मैत्री विसरला, मित्राचा खून करणाऱ्यास सहा वर्ष कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 07:22 PM2023-07-31T19:22:46+5:302023-07-31T19:23:04+5:30

जेवण केल्यानंतर दोघांत पैस्यांवरून वाद झाला, यात एकाने मित्राला कायमच संपवले

He forgot friendship for money, six years imprisonment for murdering his friend | पैशासाठी मैत्री विसरला, मित्राचा खून करणाऱ्यास सहा वर्ष कारावासाची शिक्षा

पैशासाठी मैत्री विसरला, मित्राचा खून करणाऱ्यास सहा वर्ष कारावासाची शिक्षा

googlenewsNext

- इस्माईल जाहागिरदार
वसमत (जि. हिंगोली):
औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर येथे पैसे का देत नाही? या कारणावरुन दोघा मित्रांत वाद झाला. या वादात एकाने लोखंडी रॉडने हातावर व पायावर मारहाण करुन ५० वर्षीय मित्राचा २१ ऑगस्ट २०१७ रोजी खून केला. याप्रकरणी आरोपीस सत्र न्यायालयाने आरोपीस ६ वर्ष करावास व ५ हजार दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. एन. राजे यांनी हा निकाल सुनावला.

औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर येथील श्रीराम पोले व सुभाष जाधव हे दोघे मित्र होते. दोघांनी २० ऑगस्ट २०१७ रोजी रात्री पार्टी केली होती. यावेळी पैसे का देत नाही, या कारणावरुन दोघांत वाद झाला. सुभाष जाधव याने श्रीराम पोले (वय ५०) यास लोखंडी रॉडने हातावर व पायावर मारहाण केली. यात पोले यांचा मृत्यू झाला. २१ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान श्रीराम पोले याचा खून झाल्याचे त्यांचे भाऊ नागोराव पोले (वय ६०) यांना माहिती झाले. लगेच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजे यांनी सरकार पक्षाच्या साक्ष व  पुराव्याच्या आधारे तपासणी केली. ३१ जुलै रोजी याप्रकरणी सत्र न्यायालयाचे न्यायाधीशांनी आरोपी सुभाष जाधव यास कलम ३०४ (२) अंतर्गत यास ६ वर्ष कारावास व ५ हजार दंड. दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी अभियोक्ता संतोष दासरे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मोहन डेरे यांनी केला तर न्यायालयात जोंधळे यांनी सहकार्य केले.

Web Title: He forgot friendship for money, six years imprisonment for murdering his friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.