३ लाख बालकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:59 AM2018-01-15T00:59:56+5:302018-01-15T00:59:58+5:30
निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा अंतर्गत २ लाख १५ हजार ३४२ शालेय विद्यार्थ्यांची तर १ लाख १८ हजार ९४० अंगणवाडीतील चिमुकले एकूण ३ लाख ३३ हजार ६८२ जणांची जिल्हा यंत्रणेमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर २६ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रीया करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा अंतर्गत २ लाख १५ हजार ३४२ शालेय विद्यार्थ्यांची तर १ लाख १८ हजार ९४० अंगणवाडीतील चिमुकले एकूण ३ लाख ३३ हजार ६८२ जणांची जिल्हा यंत्रणेमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर २६ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रीया करण्यात आली.
राष्टÑीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात, राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविला जातो. यासाठी एकूण १७ वैद्यकीय पथकांची नेमणूक करण्यात आली असून सदर कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वयोगटातील बालकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार केले जातात. अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनदा,आश्रमशाळेतील तिन वेळेस तर शाळेतील विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. त्या अनुषंगाने २०१७-१८ या वर्षात राष्टÑीय बालस्वाथ कार्यक्रम अंतर्गत ३ लाख ३३ हजार ६८२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ज्या बालकांना प्रदिर्घ आजार आहे, त्यांच्यावर मोफत उपचार व शस्त्रक्रीया करण्यात आली. गरजू बालकांवर राज्यातील नामांकीत प्रायव्हेट हॉस्पीटलमध्ये ही सेवा मोफत आहे. बालकास एखादा प्रदीर्घ आजार किंवा शस्त्रक्रीया करायची असल्यास त्यांना याठिकाणी सेवा उपलब्ध आहे.
राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम अंतर्गत तपासणी करण्यात आलेल्या बालकांवर मोफत उपचार केले जातात. उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून केला जातो. कार्यक्रम अंतर्गत दोन कॅम्प घेण्यात आले असून यामध्ये ५७ बालकांना ह्यदय आजार असल्याचे
आढळुन आले. यापैकी २६ बालकांची मोफत ह्यदय शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. तर इतर एकूण १४८ शस्त्रक्रीया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तिसºया कॅम्पमध्ये आढळुन आलेल्या १०३ बालकांची शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे.
बालकांच्या प्रदीर्घ आजारांवर मोफत उपचारासाठी जिल्हा रूग्णालयाचे बालाजी गाभणे ९९२११२७७०६ तसेच चव्हाण ९८५०२७३६३० यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. गोपाल कदम यांनी केले.