गाेरेगाव येथे आराेग्य तपासणी शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:17 AM2021-01-13T05:17:49+5:302021-01-13T05:17:49+5:30
गोरेगाव येथील मुख्य शिवाजी चौकात १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ ...
गोरेगाव येथील मुख्य शिवाजी चौकात १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी आ. भाऊराव पाटील, प्रशांत पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष सुनील पाटील, माजी पं.स. डॉ. आर. जी. कावरखे, गजानन कावरखे, अमोल खिल्लारी, प्रवीण पाटील, नागेश कांबळे, संजय कावरखे, संदीप कावरखे आदींची उपस्थिती हाेती.
यानंतर राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरांचे उद्घाटन करण्यात आले. अनेकांनी रक्तदान शिबिरामध्ये स्वयंस्पूर्तीने सहभाग नोंदवीत दिवसभर ५३ जणांनी रक्तदान केले, तर जन आरोग्य तपासणी औषधोपचार शिबिरामध्ये डॉ. नंदकिशोर रंजवे, डॉ. संतोष कावरखे, डॉ. मोहन गोरे, डॉ. किशोर कावरखे, डॉ. दीपाली खिल्लारी, डॉ. पूजा खिल्लारी, डॉ. दीपक खिल्लारी आदीं तज्ज्ञ डॉक्टरांकडून १६० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यादरम्यान गरजू रुग्णांना मोफत औषधोपचारही करण्यात आले.
फाेटाे नं. २३