आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:53+5:302021-09-26T04:31:53+5:30
हिंगोली : जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी तब्बल २३ हजार २३३ जणांचे लसीकरण करण्यात आले. याबद्दल जिल्हा परिषदेचे ...
हिंगोली : जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी तब्बल २३ हजार २३३ जणांचे लसीकरण करण्यात आले. याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवशी सर्वात जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये आरोग्य विभागातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्यसेविका, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व डाटा एंट्री ऑपरेटर आदी कर्मचाऱ्यांच्या मदतीने तब्बल २३ हजार २३३ जणांचे लसीकरण करण्यात आले. याबद्दल शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. प्रेमकुमार ठोंबरे यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोंद्रे, पोहरे, वाघ, नलावडे, तांबे, शिक्षणाधिकारी पावसे, सोनटक्के आदींची उपस्थिती होती.