रक्तासाठी रूग्णांचे हाल; नातेवाईकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:13 AM2019-02-02T01:13:55+5:302019-02-02T01:14:07+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढी विभागात १ फेबु्रवारी रोजी सकाळपासून कर्मचारीच हजर नसल्याने रूग्णांची धावपळ झाली. रक्त पिशवी नेण्यासाठी आलेले रूग्णांचे नातेवाईक तासन्-तास ताटकळ बसल्याचे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढी विभागात १ फेबु्रवारी रोजी सकाळपासून कर्मचारीच हजर नसल्याने रूग्णांची धावपळ झाली. रक्त पिशवी नेण्यासाठी आलेले रूग्णांचे नातेवाईक तासन्-तास ताटकळ बसल्याचे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले.
मागील अनेक दिवसांपासून जिल्हा रूग्णायातील रक्तपेढी विभागाबाबत तक्रारी वाढत आहेत. तर येथे कार्यरत कर्मचारी उडवा-उडवीचे उत्तरे देत असल्याचेही रूग्णांचे नातेवाईक सांगत आहेत. विशेष म्हणजे १ फेब्रुवारी रोजी तर रक्तपेढीत एकही कर्मचारी हजर नसल्याने रक्त पिशव्या घेऊन जाण्यासाठी आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल झाले. कार्यालयात कोणी हजर नसल्याने अनेक तास रूग्ण व नातेवाईक बसून होते. संतप्त रूग्णांच्या नातेवाईकांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना केवळ उडवा-उडवीचे उत्तरे ऐकवयास मिळत असल्याचे लोकमत शी बोलताना सांगितले. भगवा येथील विश्वनाथ सांगळे हे त्यांच्या आजारी नातेवाईकासाठी रक्त पिशवी नेण्यासाठी ते सकाळी १० वाजल्यापासून रक्तपेढीत आले होते. परंतु कोणीच हजर नसल्याचे दिसून आले. बराच वेळ बसल्यानंतर एक कर्मचारी आले होते. परंतु त्यांनीही समाधानकार उत्तर दिले नसल्याचे सांगळे यांनी सांगितले. तसेच अनेक रूग्णांनी तसेच रूग्णांच्या नोतवाईकांनी कार्यालयात कोणीच हजर नसल्याचे सांगत संतप्त प्रतिक्रीया ‘लोकमत’ शी बोलताना दिल्या.
अधिकाºयांनी लक्ष द्यावे
४जिल्हा रूग्णालयात सुविधा नाहीत, याबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. जिल्हा रूग्णालयात विविध समस्या निर्माण होत असल्याने रूग्णांचे हाल होत आहे तर नातेवाईकांची धावपळ.