आरोग्य उपसंचालकांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:25 AM2018-03-16T00:25:28+5:302018-03-16T00:25:32+5:30
जिल्हा रूग्णालयातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद येथील आरोग्य विभागाचे पथक हिंगोलीत १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दाखल झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा रूग्णालयातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद येथील आरोग्य विभागाचे पथक हिंगोलीत १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दाखल झाले होते.
हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयातील असुविधा, औषधी तुटवडा, रूग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांची गैरसोय होत असून, तसेच विविध कामांत झालेला ३० लाखांचा अपहार शिवाय मागील अनेक वर्षांपासून नवीन इमारतीच्या बांधकामाचा मुद्दाही मागील महिन्यात चांगलाच गाजला. त्यामुळे जिल्हा रूग्णालय चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच गुरूवारी औरंगाबाद येथील आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी अचानक भेट दिली. रूग्णालयातील गैरव्यवहार तसेच सुविधांचा त्यांनी आढावा घेत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कॅबीनमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांशी जवळपास दोन तास चर्चा केली. परंतु चार भिंतीच्या आत रूग्णालय प्रशासनावर वरिष्ठ अधिकारी काय ताशेरे ओढत होते हे मात्र समजू शकले नाही. तर रूग्ण्याच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मात्र गेटवरच वरिष्ठांच्या भेटीसाठी थांबल्याचे दिसून आले. आरोग्य उपसंचालक डॉ. कंदेवाड यांनी हिंगोली जिल्हा रूग्णालयास अचानक भेट दिल्याने मात्र वैद्यकीय अधिकारी भांबावून गेले होते. विशेष म्हणजे रूग्णालयातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी कामात मग्न असल्याचे दिसून आले.