आरोग्य कर्मचारी पुन्हा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:56 AM2018-05-11T00:56:58+5:302018-05-11T00:56:58+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटील अधिकारी/ कर्मचारी संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतलेले हे आंदोलन पुन्हा सुरू झाले. जिल्हा कचेरीसमोर कर्मचाऱ्यांनी धरणे दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटील अधिकारी/ कर्मचारी संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतलेले हे आंदोलन पुन्हा सुरू झाले. जिल्हा कचेरीसमोर कर्मचाऱ्यांनी धरणे दिले होते.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कर्मचाºयांना शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेत सामावून घेण्याची या कर्मचाºयांची मागणी आहे. यासाठी यापूर्वी आंदोलन केल्यानंतर त्यांना शासनाने यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याचा अद्याप आदेश निघाला नसल्याने पुन्हा आज कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. ही समिती स्थापन करण्यासह यामध्ये संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांना निमंत्रित सदस्य म्हणून समावून घ्या, एनएचएमअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचाºयांचे समायोजन करण्यासाठी पुढील पदभरती थांबवावी, यापूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या आंदोलन काळात संघटनेच्या विविध सभांमध्ये झालेल्या निर्णयानुसार मंजूर केलेल्या मागण्यांचे परिपत्रक काढावे इ. मागण्या आहेत. १४ मेपर्यंत कामबंद आंदोलन असून त्यानंतर नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढण्यात येणार आहे.२४ मे रोजी मुंबईत पोहोचल्यानंतर आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. कंत्राटी कर्मचाºयांच्या या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाल्यास त्यास संघटना जबाबदार राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित प्रश्न निकाली निघत नसल्याने जि.प.समोर उपोषण करण्यात आले. कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देणे, बदली होवून त्या ठिकाणी रुजू झालेल्यांना आॅनलाईनच्या अडचणींमुळे वेतनास होणारा विलंब थांबविणे आदी मागण्यांसाठी हे
आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्या पूर्ण न झाल्याने बी.ए.गायकवाड, एसी.व्ही. पवार, बी.बी.दुधारे, एम.बी.वाघमारे, आर.एस. कºहाळे, डी.बी.मगर, जी.बी. कदम, सी.एम. चव्हाण, एस.पी. सूर्यवंशी आदींनी आंदोलन केले.
दरम्यान, या आंदोलनस्थळी भेट देऊन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गिते यांनी आंदोलकांशी चर्चा केली. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.