जिल्ह्यात २४ ठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:35 PM2019-04-03T23:35:17+5:302019-04-03T23:36:02+5:30
जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरत असून पारा ४० अंशांच्या वर चालला आहे. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे अंगाची काहिली होऊ लागली असून चिमुकल्यांना विविध आजारही जडण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हापासून बचावाकरीता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरत असून पारा ४० अंशांच्या वर चालला आहे. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे अंगाची काहिली होऊ लागली असून चिमुकल्यांना विविध आजारही जडण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हापासून बचावाकरीता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन केला असून त्या ठिकाणी आवश्यक औषधीसाठा व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली. २४ उष्माघात कक्षाची स्थापन केली आहे.
उन्हाळ्यात उष्माघात व उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची वाढ होण्याची शक्यता असते. प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो. विशेष करून मराठवाड्यामध्ये उन्हाची तीव्रता जास्त असल्याने हे प्रमाण अधिक आढळून येते. उष्माघातामुळे अनेकांचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी व या रूग्णास तात्काळ उपचार मिळावा, यासाठी जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्षाची स्थापन केला आहे.
काय करू नये ?
लहान मुले तसेच पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.