जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:56+5:302021-09-14T04:34:56+5:30
हिंगोली : जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला असून, बोंडाळा येथील गावानजीक असलेल्या ओढ्याला पूर येऊन पुराचे पाणी अर्ध्या गावात ...
हिंगोली : जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला असून, बोंडाळा येथील गावानजीक असलेल्या ओढ्याला पूर येऊन पुराचे पाणी अर्ध्या गावात शिरले. दोन दिवस पावसाने उघडीप दिली होती. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. काही वेळेस कडक ऊनही पडले होते. दरम्यान, दुपारच्या वेळेला शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील वसमत, फाळेगाव, कनेरगावनाका, सवना, वरुड चक्रपान, बोंडाळा, कहाकर (बु), बासंबा आदी गावांमध्ये जोरदार पाऊस झाला.
हिंगोली तालुक्यातील बोंडाळानजीक असलेल्या ओढ्याला सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पूर आला होता. या पुराचे पाणी अर्ध्या बोंडाळा गावात शिरले होते. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दरवर्षी ओढ्याला पूर आला की पाणी अर्ध्या गावात शिरते, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
फोटो
१४ बोंडाळा ओढ्याला पूर
१५ बसंबा शिवार