तीन जिल्ह्यांत जोराचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:53+5:302021-06-11T04:20:53+5:30

हिंगोली: मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार १३ आणि १४ जून रोजी हिंगोली जिल्ह्यासह शेजारच्या परभणी व नांदेड जिल्ह्यांमध्येही जोराचा ...

Heavy rains in three districts | तीन जिल्ह्यांत जोराचा पाऊस

तीन जिल्ह्यांत जोराचा पाऊस

Next

हिंगोली: मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार १३ आणि १४ जून रोजी हिंगोली जिल्ह्यासह शेजारच्या परभणी व नांदेड जिल्ह्यांमध्येही जोराचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाने वर्तविला आहे.

गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सकाळी उन व दुपारच्या वेळेस ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे उन व ढगाळ वातावरणामुळे वातावरणात दमटपणा होत आहे. या दमट वातावरणामुळे डोके दुखणे, अंग दुखणे, अंग जड पडणे आदी आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. येत्या १३ व १४ जून रोजी हिंगोलीसह परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जोराच्या पावसादरम्यान शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहनही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केले आहे.

Web Title: Heavy rains in three districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.