मदतनिसांना मिळेना मानधन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:14 AM2018-09-05T00:14:09+5:302018-09-05T00:14:28+5:30

जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न अद्याप निकाली लागला नाही. शिवाय इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अनेकांना मिळाली नाही. त्यामुळे मदतनिसांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून जिल्हाभरातील मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न कायम आहे.

 Helpers get help ... | मदतनिसांना मिळेना मानधन...

मदतनिसांना मिळेना मानधन...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न अद्याप निकाली लागला नाही. शिवाय इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अनेकांना मिळाली नाही. त्यामुळे मदतनिसांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून जिल्हाभरातील मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न कायम आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. योजना प्रभावीपणे राबविण्याच्या शासनाच्या सूचना आहेत, शिवाय या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. परंतु मागील काही वर्षांपासून ही महत्त्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. कधी तांदळाचा तर कधी धान्यादी मालाचा तुटवड्यामुळे शाळकरी मुलांना पोषण आहार मिळत नाही. विशेष म्हणजे स्वयंपाकी मदतनिसांना तर वेळेत मानधन कधीच वितरित केले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातच योजना बारगळल्याचे चित्र आहे. मागील वर्षभरापासून जवळपास १८०० मदतनिसांना एक हजार रूपयांप्रमाणे दिले जाणारे मानधन तसेच इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अद्याप बँकेत जमा नाही, असे मदतनिसांतून सांगितले जात आहे. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर काम करणाºया मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करूनसुद्धा मानधन वाटपाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारीही याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यात संबंधित विभागातील कर्मचारी मदतनिसांच्या मानधनाबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे मानधन न मिळण्याचे कारण अजूनही असपष्टच आहे.
जिल्हा परिषदेच्या १ हजार शाळांमधून दीड लाखाच्या वर पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. सकस आहारापासून विद्यार्थी वंचित राहू नये, याची शासनाकडून खबरदारी घेतली जात असली तरी शापोआ यंत्रणेचा ढिसाळ कारभारच कारणीभूत असल्याचे स्वयंपाकी, मदतनीसांच्या संघटेनेतर्फे
सांगण्यात आले. त्यामुळे शिक्षणाधिकाºयांनी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असून मानधन लवकर बँकेत जमा करण्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यातील हजारो स्वयंपाकी मदतनिसांचे मानधन रखडलेले आहे.
मदतनीसांचे मानधन बँॅकेत जमा करण्याची प्रक्रिया सुरूच आहे किंवा निधी अप्राप्त आहे, असे सोयीस्कर उत्तर शिक्षण खात्यातील संबंधित विभागाकडून ऐकावयास मिळते.

Web Title:  Helpers get help ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.