वाढदिवसाचा खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:33 AM2018-09-03T01:33:12+5:302018-09-03T01:33:33+5:30
वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून तालुक्यातील अंजनवाडा येथील आत्महत्याग्रस्त एकनाथ काचगुंडे यांच्या मुलीला शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत करून ग्रामसेवक सुरज शामशेट्टीवार यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून तालुक्यातील अंजनवाडा येथील आत्महत्याग्रस्त एकनाथ काचगुंडे यांच्या मुलीला शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत करून ग्रामसेवक सुरज शामशेट्टीवार यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
औंढा पंचायत समितीचे ग्रामसेवक सूरज शामशेट्टीवार यांनी आपला वाढदिवस पारंपरिक पद्धतीला बगल देत अंजनवाडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सविता काचगुंडे हिला शिक्षण उपयोगी साहित्य व आर्थिक मदत करून साजरा केला. या कार्यक्रमाला ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव पांढरे, जिल्हा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष गंगाधरराव सोळंके, सूर्यकांत खाडे, सतीश गारोळे सागर निर्मळ, पंचायत समिती सदस्य भिमराव कºहाळे, सुरेश कुंडकर मुख्याध्यापक ढगे, सरपंच विजय काचगुंडे, ग्रा.पं.सदस्य हनवता शिंदे अमरसिंग राठोड, राजेश काचगुंडे शा.व्य.स.अध्यक्ष विलास काचगुंडे सटवाजी गारूळे, माधव खंदारे व गावातील नागरिक उपस्थित होते.