मृत वृत्तपत्र विक्रेत्याच्या कुटुंबीयांस मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:41+5:302021-06-05T04:22:41+5:30
गजानन यांच्या पश्चात पत्नी राजश्री, दहावीत शिकणारी मुलगी गौरी, सातवीत शिकणारी श्रद्धा, चौथीत शिकणारी श्रावणी व पहिलीत शिकणारी मानसी ...
गजानन यांच्या पश्चात पत्नी राजश्री, दहावीत शिकणारी मुलगी गौरी, सातवीत शिकणारी श्रद्धा, चौथीत शिकणारी श्रावणी व पहिलीत शिकणारी मानसी अशा चार कन्या आहेत. ऐन तारुण्यात गजानन यांच्यावर कोरोनाने घाला घातल्याने हुसे परिवार उघड्यावर आला आहे. हुसे यांचे वर्गमित्र सुरेश चव्हाण यांनी १०,५०० रुपये देऊन मदतीची सुरुवात केली आणि त्यांना अन्य मित्रांनी साथ देत सुमारे १ लाख २८ हजारांची मदत सुपूर्द केली. अन्य दानशूर वा शिक्षणाचा खर्च उचलू इच्छिणाऱ्या संस्थांनी पुढे यावे. मदत करू इच्छिणाऱ्यांनी राजश्री गजानन हुसे, भारतीय स्टेट बँक शाखा तहसील वसमतमधील खाते क्रमांक ४०२००५७६३८५ आयएफएससी क्रमांक एसबीआयएन००२००१ यावर मदत पाठवावी, असे आवाहन केले आहे.
हुसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य सरचिटणीस बालाजी पवार यांनी ५ हजारांचा धनादेश भेट दिला. यावेळी वितरक प्रदीप पातेकर, चंद्रकांत आळसपुरे, नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सल्लागार चंद्रकांत घाटोळ, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वडगावकर, कृष्णा उमरीकर आदी उपस्थित होते. स्व. हुस्से यांच्या मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करू, असे पवार यांनी सांगितले.