हिंगोलीत १६ परीक्षार्थी रेस्टिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:31 PM2018-03-23T23:31:57+5:302018-03-23T23:31:57+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०१८ वर्षातील दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात इयत्ता बारावी ३१ तर दहावीच्या ५३ परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत नक्कल करणाऱ्या एकूण १६ जणांना पकडण्यात आले असून त्यांना रेस्टिकेट केल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०१८ वर्षातील दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात इयत्ता बारावी ३१ तर दहावीच्या ५३ परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत नक्कल करणाऱ्या एकूण १६ जणांना पकडण्यात आले असून त्यांना रेस्टिकेट केल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.
औरंगाबाद बोर्डातर्फे शैक्षणिक वर्ष २०१८ दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. आज २४ मार्च रोजी ११ ते २ यावेळेत दहावीचा ‘आयसीटी’ शेवटचा पेपर घेण्यात येणार आहे. दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभाग व प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजन करण्यात आले. फिरत्या पथकाने विविध केंद्रांना भेटी दिल्या. जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य प्रा. शिक्षणाधिकारी, महसूल विभाग असे ५ फिरते पथक नेमण्यात आले. बैठे पथकाद्वारेही परीक्षास्थळी कॉपी करणाºयांवर वॉच ठेवण्यात आला.
परंतु जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रावर नक्कल करताना विद्यार्थी आढळुन आले. कॉपी बहाद्दरांना भरारी पथकाने रस्टिकेट केले. परीक्षेतून हद्दपार केल्याने या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमानुसार सहा महिने परीक्षा देता येणार नाही, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.
१३५५ विद्यार्थी गैरहजर
२१ फेबु्रवारी ते मार्च २० कालावधीत बारावीतील विद्यार्थ्यांची तर १ ते २४ मार्चदरम्यान दहावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. दहावीतील १७ हजार ८६९ पैकी १६ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ९३५ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर होते. बारावीतील १२ हजार ५७१ पैकी १२ हजार १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ४२० एकूण १३५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेस गैरहजर राहिले.
दहावी व बारावीची परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी परीक्षा विभागातर्फे नियोजन करण्यात आले. दक्षता समितीचे अध्यक्ष मा. शिक्षणाधिकारी दीपक चवणे तसेच प्रा. शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, उपशिक्षणाधिकारी तानाजी भोसले आदींनी परीक्षा केंद्रांना भेट देऊन
सुरळीत सुरू आहे, किंवा नाही याबाबत प्रत्यक्षपणे पाहणी केली. तर काही संशयित परीक्षा केंद्रावर पथकातील अधिकारी तळ ठोकून होते. परीक्षा विभागातील पी. वाय. कटके, एस. जे. वडकुते, एम. ए. सय्यद, जी. पी. पळसकर, विनोद करंडे आदींनी काम पाहिले.
जिल्ह्यातील विविध केंद्रावरून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीतील एकूण ७ विद्यार्थ्यांना तर बारावीतील एकूण ९ परीक्षार्थ्यांना कॉपी करताना पथकाने पकडले.