हिंगोली कृषी विभागामार्फत सूक्ष्म सिंचनावर ११.५ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:55 AM2018-04-12T00:55:21+5:302018-04-12T00:55:21+5:30

कृषी विभागामार्फत विविध योजनांतर्गत सूक्ष्म सिंचनाचा ६४३७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून यामुळे ४३५२ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यात ११.५५ कोटी रुपयांचे अनुदान शेतक-यांना अदा करण्यात आले आहे.

Hingoli Agriculture Department has spent 11.5 crore on micro irrigation | हिंगोली कृषी विभागामार्फत सूक्ष्म सिंचनावर ११.५ कोटी खर्च

हिंगोली कृषी विभागामार्फत सूक्ष्म सिंचनावर ११.५ कोटी खर्च

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कृषी विभागामार्फत विविध योजनांतर्गत सूक्ष्म सिंचनाचा ६४३७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून यामुळे ४३५२ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यात ११.५५ कोटी रुपयांचे अनुदान शेतक-यांना अदा करण्यात आले आहे.
मार्चअखेर कृषी विभागाने ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकºयांच्या अदा केलेल्या अनुदानाचा आकडा ११.५५ कोटींवर गेला आहे. विविध योजनांमध्ये १२ हजार ३९६ अर्ज शेतकºयांनी केले होते. यापैकी १३१0 अर्ज फेटाळले होते. तर स्थळ पाहणीत ८६ फेटाळले. तर ठिबक अथवा तुषार संच खरेदीची देयके सादर न केल्याने २३७९ लाभार्थ्यांना वगळण्यात आले होते.
या योजनेत एकूण ८६२१ जणांचे अर्ज प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ८५६१ अर्जांना तत्वत: मंजुरी दिली होती. यापैकी ७७१६ अर्जांसोबतच योग्य बिले सादर झाल्याचे आढळून आले. त्यातही ६१ विविध त्रुटीमध्ये बाजूला पडले. तर तालुकानिहाय अनुदान मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची संख्या औंढा नागनाथ १११७, वसमत-१४0२, हिंगोली-१२१0, कळमनुरी-१५७४, सेनगाव ११६0 अशी आहे. या सर्व लाभार्थ्यांचे अनुदानही वितरित करण्यात आलेले आहे.
या ६४३७ लाभार्थ्यांपैकी ठिबक सिंचनचे १८८५ तर तुषार सिंचन संचाचे ४५५२ लाभार्थी आहेत.
असा झाला खर्च : तालुकानिहाय चित्र
ठिबक सिंचनवर तालुकानिहाय झालेला खर्च औंढा-६५.२८ लाख, वसमत-२९९.४२ लाख, हिंगोली-४५.८, कळमनुरी-१९२.४८, सेनगाव-२२.0३ लाख असा आहे. तर तुषार सिंचन संचावर औंढा-१0८.२७ लाख, वसमत-५७.१८, हिंगोली-१२२.७, कळमनुरी-११४.४२, सेनगाव-१२७.४२ लाख आहे. यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या २२१७ असून ३.६९ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मराठवाडा विकासमध्ये १८२४ जणांना लाभ दिला असून ३.५२ कोटींचा खर्च आहे. यात ठिबकचे ६२४ तर तुषारचे ११७0 लाभार्थी आहेत.

खर्चास विलंब
या योजनेत आॅनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेपासून तर सर्वच बाबींमध्ये विलंबाने कारवाई होते, अशी शेतकºयांत कायम ओरड असते. यासाठी वेळापत्रक जाहीर केल्यास दिलासा मिळणार आहे.

Web Title: Hingoli Agriculture Department has spent 11.5 crore on micro irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.