हिंगोलीच्या कृषी सभापतींनी केला सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:25 AM2018-11-01T00:25:44+5:302018-11-01T00:26:11+5:30

जिल्हा परिषदेच्या माझ्या कार्यकाळातील पहिल्या सभेपासून वसमत येथील जि.प.शाळेच्या मैदानावरील गाळ्यांचा प्रश्न मांडत असताना त्याला कोणतीच दाद दिली जात नसल्याचा आरोप करून कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.

Hingoli Agriculture Speakers Declared Their Meet | हिंगोलीच्या कृषी सभापतींनी केला सभात्याग

हिंगोलीच्या कृषी सभापतींनी केला सभात्याग

Next
ठळक मुद्देनिर्णयच होत नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या माझ्या कार्यकाळातील पहिल्या सभेपासून वसमत येथील जि.प.शाळेच्या मैदानावरील गाळ्यांचा प्रश्न मांडत असताना त्याला कोणतीच दाद दिली जात नसल्याचा आरोप करून कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.
जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, सुनंदा नाईक, रेणूका जाधव, अति.मुकाअ मुकीम देशमुख यांची उपस्थिती होती. राखोंडे म्हणाले, मी मांडलेल्या विषयाला प्रत्येकवेळी वेगवेगळी उत्तरे देवून टाळाटाळ केली जात आहे. या जागेवर वारंवार अतिक्रमण होत आहे. शिवाय मोक्याची जागा असल्याने चांगले उत्पन्नही जि.प.ला मिळू शकते म्हणून यासाठी आग्रह असल्याचे ते म्हणाले. तर जि.प. प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीतील गाळ्यांचा ठराव नुकताच झाला. त्यामुळे सेस शिल्लक नाही. तूर्त हा विषय घेणे शक्य नसल्याने त्यावर निर्णय घेता येत नसल्याचे सांगितले. यावेळी सेनेचे गटनेते अंकुश आहेर यांनी सिंचन विहिरींचा मुद्दा लावून धरला. अनेक गावांतील प्रस्ताव जि.प.कडे आले नाहीत. तर अनेक गावांनी ठरावच घेतले नाहीत. अशांच्या नावे अडकून पडलेल्या २0 विहिरी इतर गावांना वितरित करण्याची मागणी केली. तर जेथे मागणी आहे, अनुशेष शिल्लक आहे, अशांची अडवणूक होता कामा नये, अशी मागणी केली. त्यावर प्रशासनाने प्रत्येक गावाला विहिरींबाबत पत्र दिल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तसे काही आढळले नसल्याचे सदस्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जि.प.चे खाते काढून राष्ट्रीयीकृत बँकेत टाकल्याने नेमका काय फायदा झाला, याची विचारणा केली. तर आतापर्यंत एक कोटी सात लाखांचे व्याज मिळाले, असे सांगण्यात आले. तर व्याजाचा दर चक्क ८.५ टक्के असल्याचे सांगितल्याने माहिती न देता विभागप्रमुख कुणालाही बैठकांना पाठवत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यापुढे अध्यक्ष किंवा स्थायीची परवानगी असल्याशिवाय कुणीही गैरहजर राहू नये, असे बजावण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य अजित मगर, फकिरा मुंढे, दिलीपराव देसाई, संजय कावरखे, जुमडे, राजेंद्र देसाई आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
विद्युतीकरण रखडले : अभियंताच नाही
विद्युत अभियंता नसल्याने विद्युतीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात रखडलेली आहेत. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून हा अभियंता नेमण्याचा ठराव जि.प.ने घेतला आहे. त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तेवढे सांगितले जाते. ही प्रक्रिया लवकर करण्याची मागणीही सदस्यांनी केली. औंढा व गोरेगावच्या विश्रामगृहाचा प्रश्न गाजला. औंढ्याचे विश्रामगृह पाडून तेथे शॉपिंग कॉम्प्लेक्स व नवीन इमारत तर गोरेगावच्या दुरुस्तीची चर्चा झाली होती. मात्र गोरेगावचे पाडून औंढ्याच्या दुरुस्तीचे पत्र काढल्याने आहेर यांनी नाराजी वर्तविली. नेहमीप्रमाणे जि.प.च्या आजच्या स्थायी समितीचीही सभा चांगलीच लांबली. तीन ते चार तास मॅरेथॉन चर्चा झाल्यानंतर या बैठकीची सांगता झाली. त्यालाही अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याने ओरड झाली.

Web Title: Hingoli Agriculture Speakers Declared Their Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.