हिंगोलीत एटीएमद्वारे फसवणूक करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:35 AM2018-03-10T00:35:51+5:302018-03-10T00:35:58+5:30

एटीएमची माहिती विचारून तसेच बनावट एटीएम तयार करून फसवणूक करणाºया टोळीचा हिंगोली शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

 Hingoli ATM robbed of gangs cheating | हिंगोलीत एटीएमद्वारे फसवणूक करणारी टोळी जेरबंद

हिंगोलीत एटीएमद्वारे फसवणूक करणारी टोळी जेरबंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : एटीएमची माहिती विचारून तसेच बनावट एटीएम तयार करून फसवणूक करणाºया टोळीचा हिंगोली शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एटीएमद्वारे गंडा घालणा-या ४ आरोपींना चंद्रपूर येथून हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने मुसक्या आवळल्या. आरोपींना ९ मार्च रोजी न्यायालयासमोर हजर केले असता १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोबाईलवर कॉल करून मोठ्या शिताफीने एटीएमची माहिती विचारून तसेच बनावट एटीएम बनवून गंडा घालणाºया टोळीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हिंगोली येथे काही महिन्यांपूर्वी एटीएमची माहिती विचारून संबंधितांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतल्याच्या तीन घटना घडल्या होत्या. यामध्ये ३ लाख ७७ हजार रूपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या टोळींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक नेमले. यातील एका आरोपीस यापूर्वीच अटक केल्याची माहिती पोनि अशोक मैराळ यांनी दिली. तसेच उर्वरित चार आरोपींना ८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर येथून ताब्यात घेण्यात आले. ९ मार्च रोजी आरोपींना हिंगोली येथील न्यायालयासमोर हजर केले असता १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. विशाल तुळशीराम उमरे (३४), किशन लालचंद यादव रा. विनोदनगर दिल्ली, जितेंद्रकुमार अनिलकुमार सिंग रा. बिहार, हरिदास बिच्छाव यांना पोलिसांनी पकडले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोनि मैराळ यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, पोनि अशोक मैराळ यांच्या मागदर्शनाखाली पोउपनि ज्ञानोबा मुलगीर, पीएसआय गुहाडे, दंडगे आदींनी कारवाई केली.

Web Title:  Hingoli ATM robbed of gangs cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.